रायगड : राजकारण करणारे राजकारण करत राहतील परंतु आम्ही धर्मनिरपेक्षतेचा विचार घेऊन काम करत आहोत. अल्पसंख्याक समाजातील तरुणांना ताकद देण्याचे काम करत आहोत. पावसाळ्यात जशा छत्र्या उगवतात तसे निवडणूक आली की अनंत गीते फिरायला लागतात, परंतु हा सुनिल तटकरे २४ तास तुमच्या सेवेत असतो आणि यापुढे कायम राहणार असे म्हणत जातीयवादी शक्ती आज धर्मनिरपेक्ष असल्याचे भासवत आहेत. परंतु त्यांनी ‘ईद मुबारक’ कधी म्हटले आहे का? असा सवाल महायुतीचे उमेदवार सुनील तटकरे यांनी अनंत गिते यांना केला. तसेच माझ्यावर विश्वास असल्याने २०१९ मध्ये जितके मतदान झाले. त्यापेक्षा जास्त मतदान या निवडणुकीत माझ्या अल्पसंख्याक समाजाकडून मिळेल, असा विश्वास देखील त्यांनी यावेळी व्यक्त केला. मंडणगड येथे अल्पसंख्याक समाजाचा मेळावा पार पडला. त्यावेळी ते बोलत होते.
पुढे बोलतांना ते म्हणाले की, एनडीए सरकार मुस्लिम समाजाच्या विरोधात आहे असे गैरसमज पसरवले जातात. परंतु याच एनडीए सरकारने अल्पसंख्याक बहुल समाजासाठी अनेक योजना राबवल्या आहेत. या अल्पसंख्याक बहुल योजनेत मंडणगड तालुकाही आहे. शिवाय ४० वर्षे मी धर्मनिरपेक्ष विचार घेऊन काम करत आहे. एनडीएमध्ये सहभागी होताना शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारांना घेऊन पुढे जात असल्याचेही त्यांनी सांगितले.
हेही वाचा…“..त्यामुळेच मला पुण्याचा खासदार व्हायचंय”, वसंत मोरेंनी सांगितला धक्कादायक अनुभव
तर अब्दुल कलाम महामंडळाचा निधी वाढवावा यासाठी तत्कालीन मंत्री नवाब मलिक यांनी प्रस्ताव ठेवला होता आणि वित्तमंत्री असताना त्यामध्ये वाढ केली होती. आता या महामंडळाचा सुमारे ८०० कोटी रुपये निधी झाला आहे याचे श्रेय अजितदादा पवार यांना जाते. असेही सुनील तटकरे म्हणाले.
रायगड जिल्हयात मोठ्या प्रमाणावर मच्छीमार समाज आहे. त्यांना पासपोर्ट काढण्यासाठी मुंबईला जायला लागत होते. मात्र मी खासदार झाल्यावर पासपोर्ट कार्यालय अलिबागमध्ये सुरू केले. इराणी कॉलेज महाराष्ट्रात नाहीय. त्यासाठी मुस्लिम समाजातील लोकांनी माझ्याकडे मागणी केली. आपले वैद्यकीय मंत्री हसन मुश्रीफ यांना याबाबत प्रस्ताव देताच त्यांनी २४ तासात कॅबिनेटमध्ये ३४० कोटी रुपयांच्या निधीला (इराणी कॉलेजसाठी) म्हसळामध्ये मंजुरी दिली. याशिवाय अल्पसंख्याक समाजाला वेगवेगळ्या योजनांतून मोठया प्रमाणावर निधी दिल्याचा दावाही त्यांनी यावेळी केलाय.
READ ALSO :
हेही वाचा…“आमच्या रक्तात राष्ट्रवादी, ह्यदयात भाजप तर हातात धनुष्यबाण”, मल्हार पाटलांचं मोठं विधान
हेही वाचा…ठरलं तर मग…! राम सातपुते की प्रणिती शिंदे लढतीत ‘या’ समाजाची मतं गेम चेंजर ठरणार