पुणे : एका बाजूला महायुतीचे भक्कम उमेदवार मुरलीधर मोहोळ तर दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय पक्ष असलेल्या कॉंग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर यांच्यात सरळ सरळ लढत होत आहे. मात्र यामध्ये वंचितकडून माजी नगरसेवक वसंत मोरे यांनी निवडणुकीच्या रिंगणात एंन्ट्री घेतली आहे. त्यामुळे आता पुण्यात प्रचाराचा धडाका जोरदार सुरू झाला आहे. यातच आता वसंत मोरे यांनी एक अनुभव सांगत खासदार का व्हायचं आहे ते सांगितलं आहे.
हेही वाचा…“धनंजय सावतांची मुख्यमंत्र्यांकडून आश्वासनावर बोळवण,” अर्चना पाटलांना मोठा दिलासा ?
वसंत मोरे यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट लिहिली आहे. त्यात त्यांनी असं म्हटलंय की, पुणेकरांना वसंत मोरे आपल्या घरचा माणूस का वाटतोय ? अस म्हणत वसंत मोरे यांना काल दुपारी एक फोन आला होता. त्यांनी संबंधित व्यक्तीचा फोटोही शेअर केला आहे. त्यात त्यांनी असेही लिहिलं आहे की, त्याचा मित्र कै. अरूण बन्सीलाल अरोरा वय ३२ वर्ष असून मुळचा बाहेरचा आहे. तो व्यक्ती हॉटेलमध्ये काम करतो. काल सकाळी त्याला हार्ट अटॅकचा त्रास झाला. वजन 300 किलो असल्यामुळे घरच्या लोकांना त्याला दवाखान्यात लवकर नेता आले नाही आणि योग्य उपचार योग्य वेळेत न मिळाल्यामुळे तो मरण पावला, असे त्याच्या मित्राचे म्हणणे आहे.
हेही वाचा…बड्या नेत्याने भाजपची साथ सोडली, माढ्यात वेगाने हालचाली सुरू
घरची परिस्थिती खूपच नाजूक आहे. त्यामुळे मेल्यानंतरही त्याची उपेक्षा चालूच राहिली. वैकुंठमध्ये इलेक्ट्रिक मशीन वर याचे शरीर खूप मोठे असल्यामुळे ते मशीनमध्ये जात नव्हते. मात्र विधी तर करणे गरजेचेच होता. पण लाकडू गौरी घेण्यासाठी जास्त पैसे लागत होते ते यांच्याकडे नव्हते. त्याच्या मुस्लिम मित्राने मला फोन केला आणि मदत मागितली. मी पाहिले वैकुंठमध्ये फोन करून खात्री केली आणि मग संबंधित मालकास फोन पे करून पैसे पाठवले. त्यानंतर त्याचा विधी पार पडला. असा अनुभव सांगितला आहे.
त्यावर वसंत मोरे यांनी तात्पर्य देखील त्यांनी सांगितले आहे. वसंत मोरे म्हणाले की, मागच्या काळात चालू केलेली पुणे महानगरपालिकेची गरिबांना स्मशानात मदत करण्याची योजना संपली की काय? जर या अरुणला योग्य वेळी योग्य उपचार मिळाले असते तर तो कदाचित वाचलाही असता. या पुणे शहराची आरोग्यवस्था सुधारण्यासाठी मला खासदार व्हायचंय. अरुणला भावपूर्ण श्रद्धांजली असेही त्यांनी म्हटलंय.
READ ALSO :
हेही वाचा…“सुपारी वाजवणारा” अशी पदवी देवेंद्र फडणवीस यांनीच राज ठाकरेंना दिली, कुणी डिवचलं ?
हेही वाचा…“अहंकारी सत्ताधाऱ्यांचा या निवडणूकीत करेक्ट हिशोब केल्याशिवाय गप्प बसणार नाही”
हेही वाचा…“दोन तुकडे करायचे आणि आपणच त्याला नकली म्हणायचं”, जयंत पाटलांचा अमित शाहांना टोला