मुंबई : शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी राज्यातील विरोधकांचा उल्लेख ब्लॅक फंगस केला होता. त्यांच्या या टीकेनंतर आता भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे. ‘हे अख्ख सरकारच जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना’, असल्याची बोचरी टीका आता भाजपने केली आहे.
श्रीमान संजय राऊत म्हणतात विरोधक ‘ब्लॅक फंगस’ आहेत! पण, त्यांना हे ठाऊक नाही की हे अख्ख सरकारच जनतेच्या मानगुटीवर बसलेला कोरोना असून पक्ष तीन असले तरी यात कितीतरी विविध प्रकारचे ‘म्युटंट’ आहेत, अशी सणसणीत टीका प्रवीण दरेकर यांनी महाविकास आघाडीवर केली आहे.
प्रवीण दरेकर यांनी संजय राऊत यांचा उल्लेख कंपाउंडर असा करत देखील जोरदार निशाणा साधला. महाविकास आघाडी सरकारला केवळ भ्रष्टाचाराचा ‘ब्लॅक फंगस’ चिकटलेला नाही, तर राजरोस पोलिसी वसुलीच्या ‘व्हाईट फंगस’चाही रोग जडलेला आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या तज्ञ डॉक्टरांच्या ‘कंपाऊंडर’ला एवढेही ठाऊक नसावे ? आश्चर्य आहे!, अस खोचक टोला दरेकरांनी संजय राऊतांना लगावला आहे.
दरम्यान, पुण्यात कोविड सेंटरच्या ऑनलाईन उद्धाटनावेळी बोलताना संजय राऊत यांनी विरोधकांवर हल्ला चढवत त्यांना ब्लॅक फंगस असे संबोधले. कोरोना उद्रेकाळाच्या काळात मुंबईत चांगलं काम झालं आहे. या कामाची दखल जागतिक आरोग्य संघटना आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही घेतली. तरी देखील विरोधक टीका करत आहेत. या टीकेकडे शिवसैनिकांनी दुर्लक्ष करून कामावर लक्ष केंद्रित करावे, कारण विरोधक ब्लॅक फंगस आहेत, अशी बोचरी टीका राऊत यांनी केली होती.
Read Also :
- शरद पवारांचे उदाहरण देत चंद्रकांत पाटलांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला, म्हणाले…
- ‘राज्यातले विरोधक हे ‘ब्लॅक फंगस’, त्यांच्याकडे दुर्लक्ष करा’
- एकाच दगडात दोन पक्षी मारणारे मलिक; आपल्याच सरकारला बदनाम करून घरचा आहेर देत आहेत
- अजितदादांनी आता स्वतःच कोकण दौरा करून, “दादा”स्टाईलने पंचनामे करून घ्यावेत
- मुख्यमंत्र्यांचा कोकण दौरा लिपस्टिक नव्हे; नुसता “पावडर दौरा” होता