दहा महिन्यांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या टि्वटर फॉलोअर्सच्या संख्येत 1 कोटी लोकांची भर पडली आहे. त्यामुळे मोदींच्या फॉलोअर्सची संख्या सहा कोटींच्या पुढे गेली आहे.
सप्टेंबर 2019 पर्यंत पंतप्रधान मोदींना ट्विटरवर एकूण 5 कोटी लोक फॉलो करत होते. ते आता वाढून 6 कोटी झाले आहेत. याचा अर्थ केवळ 10 महिन्यांतच त्यांना तब्बल 1 कोटी लोकांनी ट्विटरवर फॉलो केले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे ट्विटरवर 2 कोटी 16 लाख एवढे फॉलोअर्स आहेत. तर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना 1 कोटी पाच लाख लोक ट्विटरवर फॉलो करतात.
जागतिक नेत्यांच्या यादीत मोदींनी टि्वटरवही चांगलेच स्थान मिळवलेलं आहे. सध्या मोदी जागतिक नेत्यांच्या टि्वटर फॉलोअर्सच्या संख्येनुसार तिसऱ्या स्थानावर आहेत. सध्या या यादीत बराक ओबामा पहिल्या स्थानावर आहेत. सध्या 12 कोटी लोक बराक ओबामा यांना टि्वटरवर फॉलो करतात. मोदी यांना 6 कोटी लोक टि्वटरवर फॉलो करत आहेत. डोनाल्ड ट्रम्प दुसऱ्या स्थानावर असून त्यांच्या फॉलोअर्सची संख्या 8.3 कोटी आहे.