उत्तर प्रदेश : हाथरस सामूहिक बलात्कार प्रकरणावरून देशभरामध्ये संतापाची लाट उसळली आहे. क्रौर्याच्या सर्व सीमा ओलांडणाऱ्या या घटनेविरोधात देशभरात ठिकठिकाणी प्रदर्शने होत आहेत. अशातच आज काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी व काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी पुन्हा एकदा बलात्कार पीडितेच्या कुटुंबीयांची भेट घेण्यासाठी हाथरसमध्ये दाखल झाले आहे.
तत्पूर्वी, गुरुवारी राहुल गांधी व प्रियंका गांधी हे पीडितेच्या कुटुंबियांना भेटण्यासाठी हाथरसकडे निघाले असता त्यांना यमुना द्रुतगती महामार्गावर अटक करण्यात आली होती. यावेळी राहुल गांधी यांना पोलिसांनी अडवण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली आणि ते तोल जाऊन खाली पडले होते.
Read Also :
“एक पक्ष एक मागणी दोन आंदोलन” नगर जिल्हा कॉंग्रेसचा प्रताप https://t.co/wpGu8sk1eN @bb_thorat @satyajeettambe @prajaktdada @GadakhShankarao
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 3, 2020