मुंबई : भाजप नेते निलेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत ट्विट केले की, पवार आणि ठाकरे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत. जगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते म्हणजे महाराष्ट्र विकला असं म्हणायचय काय?? महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठं केलं, हे राज्य कोणाच्या बापाचे नाही. हे राज्य जनतेने मोठे केले कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही. मुंबई असो कि महाराष्ट्र.. एकच ब्रँड.. छत्रपती शिवाजी महाराज!!
दरम्यान , निलेश राणे यांनी देखील टीका करताना म्हणाले, ” संज्या म्हणतो पवार आणि ठाकरे महाराष्ट्राचे ब्रँड आहेत. त्याला सांगा जगात ब्रँडची निर्मिती वस्तू विकायला केली जाते म्हणजे महाराष्ट्र विकला असं म्हणायचय काय??? महाराष्ट्राने अनेक लोकांना मोठं केलं, हे राज्य कोणाच्या बापाचे नाही. हे राज्य जनतेने मोठे केले कुठल्या विकाऊ ब्रँडने नाही.” , असा शब्दात निलेश राणेंनी सडकून टीका केली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेच्या अग्रलेखातून ठाकरे आणि पवार ब्रॅण्डवर भाष्य केले. यावर राणे बंधूंनी राऊतांवर निशाणा साधला आहे.