नकुल नाडकर्णी
कुडाळ शहरातील पानबाजार आणि मज्जिद मोहल्ला तसेच नेरुर दुर्गवाड येथील शेकडो राणे समर्थकांनी शनिवारी रात्रौ शिवसेना आमदार वैभव नाईक व जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या प्रमुख उपस्थितीत शेकडो युवकांनी शिवसेनेत प्रवेश केला शिवसेना पक्षात प्रवेश केला. या प्रवेशामुळे याठिकाणी भाजप पक्षाला खिंडार पडले आहे. कुडाळ शिवसेना शाखा येथे शिवबंधन बांधुन पक्षाच्या शाली घालून सर्वांचे पक्षात स्वागत करण्यात आले.
शिवसेनेत प्रवेश केलेल्या युवकांचा योग्य सन्मान केला जाईल. तसेच तुमचे सर्व प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी आम्ही प्रमाणिक प्रयत्न करू अशी ग्वाही यावेळी आमदार वैभव नाईक यांनी दिली. यावेळी जिल्हा प्रमुख संजय पडते यांनी देखील मार्गदर्शन केले.
यावेळी शिवसेना उपजिल्हाप्रमुख अमरसेन सावंत, जि. प. सदस्य तसेच गटनेते नागेंद्र परब, माजी जि. प. अध्यक्ष विकास कुडाळकर, शहर प्रमुख संतोष शिरसाट, संजय भोगटे, नगरसेवक सचिन काळप, बाळा वेंगुर्लेकर, युवासेना जिल्हा प्रमुख मंदार शिरसाट, सुशील चिंदरकर,राजू जांभेकर रुपेश पावसकर, कृष्णा तेली,नितीन सावंत, उदय मांजरेकर, जीवन बांदेकर, बाळा पावसकर, चेतन पडते आदी शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.
याप्रसंगी नेरूर पं.स. मतदारसंघ युवासेना उपविभाग समन्वयकपदी जोएल मुश्ताक नाईक, पानबाजार शाखाप्रमुख ताहीर नदाफ, दुर्गवाड उपशाखाप्रमुख सुफियान मुजावर यांची निवड करण्यात आली.