बीड : आज बीड जिल्ह्यातील बहु प्रतिक्षित आष्टी- अहमदनगर रेल्वे मार्गाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप नेत्या पंकजा मुंडे, खासदार प्रतिम मुंडे आदि नेते उपस्थित होते. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या कार्यक्रमाला ऑनलाईन हजेरी लावली. मात्र पोलिसांची मानवंदना बीडमध्ये केंद्रीय मंत्र्यांची उपस्थिती असताना उपमुख्यमंत्र्यांनी घेतल्याने राष्ट्रवादीने त्यावर टिका केली आहे.
“मशिदीवरील भोंगे, टोलनाके, आता राज ठाकरेंनी हाती घेतला नवीन मुद्दा” राज्य सरकारलाही दिला इशारा
बीड – अहमदनगर रेल्वे मार्गाचा शुभारंभ करण्या अगोदर फडणवीसांचं स्वागत राज्याचे कॅबिनेट मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी केलं. त्यानंतर प्रोटोकाॅलनुसार प्रमुख पाहुण्यांना मानवंदना देण्यात आली. यावर राष्ट्रवादीने आक्षेप नोंदवला आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी यांसदर्भात एक ट्विट केलं आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचा प्रोटोकॉल नुसार प्रथम मान येतो. मात्र उपमुख्यमंत्री पद हे असांविधानिक आहे असं म्हणणाऱ्या देवेंद्र फडणवीस प्रोटोकॉलच उल्लंघन केलं होतं. केंद्रीय मंत्री हे मुख्यमंत्र्यापेक्षाही प्रोटोकॉलने पहिले असतात. असंही ते म्हणाले.
श्रीकांत शिंदे थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले..! रूपाली पाटील म्हणाल्या,” याला हावरेपणाची…”
अहमदनगर आणि बीड या दोन जिल्ह्याला हा मार्ग जोडला गेला आहे. दिवंगत केशर काकू क्षीरसागर, दिवंगत गोपीनाथ मुंडे यांनी यासाठी मोठे प्रयत्न केले होते. या लोहमार्गाचे लोकार्पण झाले असून आजपासून नियमित ही रेल्वे धावणार आहे.
“एक वर्ष शेतात राब राब राबलो अन् कराड इंजिनिअरिंगला गेलो..!” डॉ.तानाजीराव सावंत
पुढील काळात वेगाने काम पूर्ण होईल असं फडणवीसांनी विश्वास व्यक्त केला. 1995 साली हा रेल्वे मार्ग मंजूर झाला होता. मात्र आज अखेर 22 वर्षानंतर लोहमार्गावर प्रत्यक्ष पॅसेंजर रेल्वे धावली, हा ऐतिहासिक क्षण पाहण्यासाठी आष्टीकरांनी मोठी गर्दी केली होती.
केंद्रीय राज्यमंत्री @raosahebdanve यांचा प्रोटोकॉल नुसार प्रथम मान येतो.मात्र उपमुख्यमंत्री पद हे असांविधानिक आहे असं म्हणणार्या @Dev_Fadnavis प्रोटोकॉलच उल्लंघन केलय. केंद्रीय मंत्री हे मुख्यमंत्र्या पेक्षाही प्रोटोकॉलने पहिले असतात. @RVikhePatil pic.twitter.com/DeLif1f0Iy
— Ravikant Varpe – रविकांत वरपे (@ravikantvarpe) September 23, 2022
Read also
- “मी खासदार आहे, कुठे बसायचं अन् कुठे नाही हे कळत मला”; व्हायरल झालेल्या फोटोवर शिंदेंचं स्पष्टीकरण
- “मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडली जात नाही”
- शिवतीर्थ मैदान कुणाला मिळणार? कोर्टात दोन्ही बाजूंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद
- “मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे की किराण्याचा गल्ला?” कायंदेंनी श्रीकांत शिंदेंना सुनावलं
- “गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी, व्वा रे सत्तधारी..!”