पुणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेविरोधात बंडखोरी केल्यानंतर राज्यातील राजकीय वातावरण चांगलच पेटलं आहे. दिवसेंदिवस शिंदे सरकार आणि विरोधकांमध्ये आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. यातच शिंदे गटाचे खासदार श्रीकांत शिंदे यांच्यावर राष्ट्रवादीच्या नेत्या रूपाली पाटील यांनी निशाणा साधला आहे.
उद्धव ठाकरेंंची दिवसेंदिवस ताकद वाढतेय; राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षांनी सेनेत केला प्रवेश
रूपाली पाटील यांनी एक फेसबुकवर फोटो पोस्ट केला आहे. शिंदे गटाचे खासदार आणि एकनाथ शिंदे यांचे पुत्र मुख्यमंत्र्यांच्या खूर्चीवर बसताना दिसत आहेत. त्यावरून रूपाली पाटील यांनी त्यांच्यावर टिका केली आहे. मिंधे गटाचे खरे मुख्यमंत्री कोण? कोणी माईक हिसकावून घेतेय तर कोणी यांची खुर्ची हिसकावतय बाप मुख्यमंत्री आहे म्हणून मुख्यमंत्रीपदाच्या खुर्चीवर जाऊन बसने म्हणजे याला हावरे पणाची घराणेशाही बोलतात असं म्हणत रूपाली पाटील यांनी शिंदेंना ठणकवलं आहे. तसेच निदान त्या खुर्चीचा तरी योग्य सन्मान करावा असं देखील रूपाली पाटलांना शिंदेंना सुनावलं आहे.
“माझे कुटुंब, माझी जबाबदारी, आम्ही फक्त चार राहू बाकी कोणीच नाही”; चंद्रशेखर बावनकुळे
यातच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देखील जिल्ह्याधिकांऱ्यांच्या खुर्चीवर जाऊन बसले होते. त्यावेळी देखील विरोधकांनी त्यांच्यावर जोरदार टिका केली होती. ना मंत्री, ना पालकमंत्री तरी देखील बावनकुळे जिल्ह्याधिकाऱ्यांच्यावर खुर्चीवर का बसले? असा सवाल त्यावेळी विरोधकांनी भाजपला केला होता. त्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली होती.
“उद्धव ठाकरेंनी कालचं भाषण दारू पिऊन केलंय”; अन् नारायण राणेंची जीभ घसरली
दरम्यान, गेल्या अनेक दिवसापासून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये विविध मुद्यांवरून आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण चांगलचं तापलं आहे.
Read also
- “एक वर्ष शेतात राब राब राबलो अन् कराड इंजिनिअरिंगला गेलो..!” डॉ.तानाजीराव सावंत
- शिवसेना शिंदे गट लागला कामाला…! सोलापुरात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर
- “शरद पवारांना राऊतांबद्दल सहानुभूती दिसतेय, त्यांनी सांगावं की ते निर्दोष आहेत”; किरीट सोमय्या
- “एकाने देश विकला, एक महाराष्ट्र विकतोय”
- “माझे काम भाजप व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारसरणी संपवण्याचे आहे”; राहुल गांधी