मुंबई : एकनाथ शिंदे यांनी भाजपसोबत युती करत मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर ते ह्या ना त्या कारणांमुळे सतत चर्चेत राहिले आहेत. त्यांच्यावर विरोधक सातत्याने त्यासंदर्भात टिका देखील केली आहे. अशातच दिल्ली येथील पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री बोलत असताना बंडखोर आमदार संदीपान भुमरे हे डोळ्यांच्या भुवयाने दुसऱ्यांना इशारा करताना दिसत आहे. यावरून काॅंग्रेसने त्यांच्यावर निशाणा साधला आहे.
“एक वर्ष शेतात राब राब राबलो अन् कराड इंजिनिअरिंगला गेलो..!” डॉ.तानाजीराव सावंत
मुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर एकनाथ शिंदे हे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत दिल्ली दौऱ्यावर गेले होते. त्यावेळी पत्रकारांनी शिंदेंना प्रश्न विचारल्यावर ते गोंधळून गेले. त्यानंतर फडणवीसांनी शिंदेंचा माईक स्वत: जवळ ओढून घेतल्याने त्यांच्यावर विरोधकांनी निशाणा साधला होता. त्यानंतर भाजप नेते गिरीश महाजन यांच्यासोबत देखील शिंदेंची पत्रकार परिषद पार पडली.
शिवसेना शिंदे गट लागला कामाला…! सोलापुरात शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांची जम्बो कार्यकारिणी जाहीर
त्यावेळी देखील पत्रकारांनी राज्यातील राजकीय घडामोडीसंदर्भात प्रश्न विचारताच गिरीश महाजन यांनी शिंदेंच्या कानात त्या प्रश्नांवर बोलताना माहिती घेऊन सांगतो असं म्हटलं होतं. त्याचाच प्रत्यय पुन्हा एकदा दिल्लीमध्ये शिंदेबाबत बघायला मिळाला. दसरा मेळाव्यासंदर्भात एकनाथ शिंदे बोलत असताना त्यांच्या बाजूला बसलेले बंडखोर आमदार संदीपान भुमरे समोरच्या व्यक्तीला डोळ्याने खुनवत असल्याचं दिसून आलं.
“शरद पवारांना राऊतांबद्दल सहानुभूती दिसतेय, त्यांनी सांगावं की ते निर्दोष आहेत”; किरीट सोमय्या
दरम्यान, याबाबत काॅंग्रेसने व्हिडीओ देखील शेअर करत त्यांना चांगलाच टोला लगावला आहे. त्यात त्यांनी असं म्हटलं आहे की, कधी फडणवीस सर्वांसमोर चिठ्ठी देऊन शिंदेंंना काय बोलायचं ते सांगतात. कधी महाजन तोंडासमोर कागद धरून काय उत्तर द्यायचं ते पुटपुटतात आणि आता तर शिंदे गटातील आमदार भुमरे देखील शिंदे भाषण करत असताना इशारे करून लक्ष वेधतात. मुख्यमंत्र्यांची खिल्ली उडवण्याची एकही संधी सोडली जात नाही आहे. असा टोला काॅंग्रेसने हाणला आहे.
Read also
- शिवतीर्थ मैदान कुणाला मिळणार? कोर्टात दोन्ही बाजूंच्या वकिलांचा जोरदार युक्तिवाद
- “मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे की किराण्याचा गल्ला?” कायंदेंनी श्रीकांत शिंदेंना सुनावलं
- “गब्बर होतायेत शेजारी, महाराष्ट्र पडतोय आजारी, व्वा रे सत्तधारी..!”
- “मशिदीवरील भोंगे, टोलनाके, आता राज ठाकरेंनी हाती घेतला नवीन मुद्दा” राज्य सरकारलाही दिला इशारा
- श्रीकांत शिंदे थेट मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसले..! रूपाली पाटील म्हणाल्या,” याला हावरेपणाची…”