मुंबई : मुंबई पोलिस दलात खळबळ माजवून देणारी बातमी समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या मोटर परिवहन विभागातील आठ महिला पोलिसांनी पोलिस उपायुक्त, दोन नरिक्षक, तीन कॉन्स्टेबल यांच्यावर बलात्काराचा आरोपा केला आहे. त्यांनी यासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पोलीस आयुत्त यांना पत्र लिहिलं आहे. सध्या हे पत्र मुंबई पोलिस दलातील प्रत्येक अधिकारी कर्मचाऱ्यांच्या मोबाईलवर फिरत असून सोशल मीडियावरही हे पत्र व्हायरल झालं आहे. या लेटरबॉम्बने पोलिस दलात मोठी खळबळ उडाली असून वरिष्ठांनी याबाबत सारवासारव केली जात आहे. या प्रकरणावरून राज्यातील विरोधी पक्षातील नेत्यांनी जोरदार टिका केली आहे. तर महिला आयोगाने देखील या प्रकरणात उडी घेतली आहे.
हेही वाचा…रोखठोक भूमिका घेणारे किरण मानेंचा ठाकरे गटात प्रवेश, मनसेच्या ‘या’ नेत्यांनीही ठाकरेंची वाट धरली
मुंबई पोलिसांच्या मोटार परिवहन विभाग नागपाडा येथील ८ महिला पोलिसांनी त्यांच्या विभागातील वरिष्ठ पोलिसांकडून लैंगिक छळ होत असल्याचे बातमी समाज माध्यमाद्वारे प्रसारीत होत आहे. ही बातमीची आयोगाने दखल घेतली आहे. तरी सदर प्रकरण अतिशय गंभीर स्वरूपाचे असून, प्रकरणाची सत्यता पडताळून वस्तुस्थितीदर्शक अहवाल महाराष्ट्र राज्य महिला आयोग कायदा १९९३ कलम १२ २ व १२ ३ नुसार आयोगास तात्काळ पाठवण्यात यावा असं महिला आयोगाच्या अध्यक्षा रूपाली चाकणकर यांनी पोलिस आयुक्तांना म्हटले आहे.
हेही वाचा…सुप्रीम कोर्टाचा गुजरात सरकारला मोठा दणका, बिल्किस बानोच्या आरोपींच्या सुटकेचा निर्णय रद्द
पोलिस दलात महिलांनी अशा पद्धतीने आरोप केल्यानंतर विरोधकांनी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका करण्यास सुरूवात केली आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे शहाराध्यक्ष प्रशांत जगताप यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टिका केली आहे. राज्यातील महिलांचं रक्षण करण्याची जबाबदारी असलेल्या पोलीस दलातील महिलाच सुरक्षित नाहीत. कुंपणच शेत खात असताना गृहमंत्री देवेंद्र फडणवीस केवळ स्वत: ची खुर्ची वाचवण्यात व्यस्त आहेत. इतकं निष्क्रिय गृहमंत्री या राज्याला कधी लाभला नाही. अशी टिका प्रशांत जगताप यांनी केलीय.
दरम्यान, मोटर परिवहन विभागातील आठ महिला कर्मचाऱ्यांनी बलात्काराचा आरोप केला आहे. त्यांनी यासंदर्भात पत्र लिहिलं असून पत्रात अनेक धक्कादायक गोष्टींचा उलगडा केला आहे. दोन पोलिस निरिक्षक आम्हाला सरकारी वाहनातून घरी घेऊन गेले आणि उपायुक्तांसह इतर अधिकाऱ्यांनी आमच्यावर तेथे बलात्कार केला आहे. पती तसेच इतर कुटुंबीय गावी असल्याने आम्ही महिला मुंबईत एकट्याच राहत असून पोलीस दलाबाबतही फारशी माहिती नाही. याचाच गैरफायदा घेऊन हे अधिकारी आम्हाला वारंवार शारीरीक संबंध ठेवण्यास भाग पाडत आहेत. हे सर्व कायमचे थांबविण्यासाठी आम्ही उपायुक्तांची भेट घेतली. परंतु त्यांनी आम्हाला केबिनमधून हाकलून लावल्याचं पत्रात म्हटलं आहे.
मुंबई पोलीसांच्या मोटार परिवहन विभागातील महिला पोलीसांनी त्यांचा वरिष्ठ पोलीसांकडून लैंगिक छळ होत असल्याची तक्रार पत्राद्वारे केल्याचे विविध माध्यमांतून समोर आले आहे. राज्य महिला आयोगाने याची दखल घेतली असून पोलीस आयुक्त, 1/2@MumbaiPolice @DGPMaharashtra pic.twitter.com/vhB6vZXZ1H
— Rupali Chakankar (@ChakankarSpeaks) January 8, 2024
READ ALSO :
हेही वाचा…२० जानेवारीला आझाद मैदानात आंदोलनाची परवानगी देऊ नका”, भाजपच्या खासदारांचं मोठं विधान, वाद पेटणार
हेही वाचा…गुंड शरद मोहोळच्या कुटुंबियांची नितेश राणे भेट घेणार, राजकीय वर्तुळात एकच चर्चा
हेही वाचा…पुणे लोकसभा पोटनिवडणुकीला पुर्णविराम, हायकोर्टाच्या आदेशाला सुप्रीम कोर्टाकडून स्थगिती
हेही वाचा“‘रक्षणकर्ते’ हेच जर ‘शोषणकर्ते’ होत असतील तर..” मुंबईच्या घटनेवरून आव्हाडांनी व्यक्त केला संताप
हेही वाचा…लहू बालवडकरांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ‘भव्य भजन स्पर्धा’ ; चंद्रकांत पाटलांच्या उपस्थित पार पडला बक्षिस वितरणाचा सोहळा