पुणे : भारतीय जनता पार्टी शिवाजीनगर मतदार संघाच्या वतीने नवरात्र उत्सवानिमित्त नवदुर्गा सन्मान सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. शिवाजीनगर मतदारसंघातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या महिलांचा यावेळी सन्मान आमदार सिद्धार्थ शिरोळे, संघटन सरचिटणीस राजेश पांडे, दत्ता खाडे, प्रभाग समिती अध्यक्ष निलिमा खाडे, नगरसेविका जोस्तना एकबोटे यांच्या हस्ते करण्यात आला.
राज्यात लवकरच सत्ताबदल, शिवसेनेचे 12 आमदार आमच्या संपर्कात : बबनराव लोणीकर
यावेळी ज्योत्स्ना सरदेशपांडे, शामला देसाई, शकुंतला खटावकर, प्रमिला धाम, पूनम शेंडे, ज्योती देशपांडे, नीलिमा जगदाळे, कमल अनपट , उमा शर्मा, अदिती मोगर, मंजिरी जोशी, श्वेता पगार, शिवानी गोरे, कमल कांबळे, आशा सकपाळ, मालती काकडे, क्रांती कांबळे, संजना शहा या शासकीय, सामाजिक, आरोग्य, साहित्य, मनोरंजन क्षेत्रातील महिलांचा सन्मानचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
रविंद्र साळेगावकर म्हणाले, महिलांचा सन्मान हाच समाजाचा अभिमान असून, स्त्री शक्ती जन्मापासूनच वेगवेगळ्या रुपात आपल्यावर संस्कार करत असते. ज्याचा उपयोग आपल्याला आयुष्यभर समाजात वावरताना होत असतो. त्यामुळे आज हा सन्मान सोहळा आयोजित केल्याचा विशेष आनंद होत आहे. आताच्या महिला घर सांभाळून बाहेर देखील आपलं कर्तव्य बजावत आहेत. आशा या नवदुर्गांचा आज सन्मान करण्यात येत आहे.
आमदार शिरोळे म्हणाले, हा योग्य व्यक्तींचा सन्मान करणारा कार्यक्रम आहे. या व्यक्ती समाजामध्ये खऱ्या अर्थाने काम करत असतात. आणि अशाप्रकारे मान सन्मान मिळाल्यामुळे काम करायला ऊर्जा मिळते, हि मंडळी कुठलीही अपेक्षा न ठेवता काम करत असतात. मानवतेचे, समाजाचे खरे काम हे लोक करत आहेत. या व्यक्तींकडून आम्हाला शिकण्यासारखे आहे. तसेच त्यांनी सर्व सत्कार मूर्तींचे अभिनंदनही केले. दरम्यान, प्रभाग समिती अध्यक्ष निलिमा खाडे यांनी रविंद्र साळेगावकर यांचे आणि सत्कार मूर्तींचे अभिनंदन केले. रविंद्र साळेगावकर यांच्या नावाचा उल्लेख त्यांनी कार्यक्षम अध्यक्ष म्हणून केला आणि त्यांचे अभिनंदन केले.
Read Also :
- 11 ऑक्टोंबरच्या देशव्यापी आंदोलनाची सुरूवात महाराष्ट्रातून; शिवसेना पुर्ण ताकतीने सहभागी होणार
- एकत्र आलेत ठाकरे आणि राणे, मला आठवते युतीचे गाणे; रामदास आठवलेंची भन्नाट चारोळी
- बाळासाहेबांनी खोटं बोलणारांना शिवसेनेतून हाकलून लावलं; मुख्यमंत्री ठाकरेंचा राणेंवर हल्लाबोल
- मंचावर येण्यापूर्वी मुख्यमंत्री माझ्या कानात बोलले, मी एक शब्द एकला – नारायण राणे
- विमानतळ नको म्हणून आंदोलन करणारे आज मंचावर आहेत; नारायण राणेंचा रोख कुणाकडे?