अहमदनगर : भाजपचे आमदार राम शिंदे यांच्या चोंडी याठिकाणी दिवाळी फराळाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी राम शिंदे यांनी पत्रकारांशी संवाद साधताना राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांच्यावर निशाणा साधला. माझ्या मतदार संघात येऊ नका म्हणून रोहित पवारांनी मंत्री तानाजी सावंत यांना दहा फोन केले असल्याचं वक्तव्य राम शिंदे यांनी केलं. त्याला आता रोहित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
“आपले मुख्यमंत्री दहीहंडी, मंडळ, फोडाफोडी या व्यतिरिक्त काहीच करत नाहीत”
ज्याला पैसा आणि अंहकाराची खाज आहे. ज्याला हाफकीन व्यक्ती आहे की संस्था आहे हे माहिती नाही. जो महाराष्ट्राला भिकारी करण्याची भाषा करतो. अशा व्यक्तीला माझ्या मतदार संघात न येण्याचा कशाला मस्का लावू? त्यामुळे शिंदे साहेब पुड्या सोडू नका. असा म्हणत रोहित पवारांनी राम शिंदेंना चांगलाचं डिवचलं. त्यामुळे नगर जिल्ह्यातील राजकीय वातावरण तापण्यास सुरूवात झाली आहे.
“25 पैशांवर नारायण राणेंचा फोटो.. हे फायनल करा..!” वादग्रस्त पोस्ट व्हायरल
पुढे बोलताना रोहित पवार म्हणाले की, खेकड्यांची चाल लोकं स्वीकारत नाही. हिमंत असेल तर याचा पुरावा द्या. आणि यापुढे तुमच्याच प्रचाराला त्यांना याठिकाणी बोलवा. मग बघू मैदानात .. असं म्हणत रोहित पवारांनी राम शिंदे यांना आवाहन दिलं आहे. त्यामुळे त्याला आता राम शिंदे काय प्रत्युत्तर देणार ते पहाणं महत्वाचं ठरणार आहे.
“माझी नाहीतर देशातील 130 कोटी जनतेची मागणी”; केजरीवालांचं मोदींना पत्र
दरम्यान, राम शिंदे यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर देखील टिका केली आहे. मला वेगवेगळ्या मुद्यांवरून टोकलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला हे मला मान्य आहे. पंरतु ज्यांनी 15 वर्ष मागच्याच दारातून लोकप्रतिनिधी म्हणून केंद्र सरकारला सल्ले दिलेत. त्यांना देखील असंच म्हणायचं का. ? असा सवाल देखील राम शिंदे यांनी रोहित पवारांना केला आहे.
Read also
- अपघातग्रस्तांच्या मदतीला धावले, गंगाखेडचे आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे
- “राष्ट्रवादीने २३ वर्षात साडेसतरा वर्ष सत्तेत राहून जनसेवा केली”
- “मिंधे-फसनवीस सरकारने आता ‘जय जय गरवी गुजरात’ हा नारा बुलंद द्यावा”; सेेनेची जहरी टिका
- “सध्याच्या घडीला नारायण राणेंची किंमत चार आण्याची आहे”
- “..तर एक दिवस शिंदे सरकार मुंबईलाही गुजरातला देऊन टाकतील”