IMPIMP

निवृत्त अधिकाऱ्याला मारहाण, आता काँग्रेसने फडणवीस सरकारच्या काळातील ‘ते’ प्रकरण आणले समोर

मुंबई : राज्यात सध्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी निवृत्त नौदल अधिकारी मदन शर्मा मारहाण केल्याची घटना चर्चेत आहे. यावरून राज्यातील राजकारण तापले आहे. केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी देखील मदन शर्मा यांची विचारपूस केली व अशा घटना स्विकारल्या जाणार नाहीत असे म्हटले. विरोधी पक्ष भाजप देखील सरकारवर जोरदार टीका करत आहे. याच पार्श्वभूमीवर आता काँग्रेसने फडणवीस सरकारच्या काळातील एक लष्करी अधिकाऱ्याला मारहाण केल्याचे जुणे प्रकरण उकरून काढले आहे.

काँग्रेस नेते सचिन सांवत यांनी ट्विट केले की, 2019 साली फडणवीस सरकारच्या काळात चाळीसगावचे भाजप खासदार उन्मेष पाटील यांच्या सांगण्यावरून निवृत्ती लष्कर अधिकारी सोनू महाजन यांच्या हत्येचा प्रयत्न करण्यात आला. तक्रार दाखल करण्यासाठी हे कुटुंब सर्वोच्च न्यायालयात देखील गेले. मात्र आतापर्यंत भाजपकडून स्वतःच्या खासदारावर कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही.

निवृत्त लष्करी अधिकाऱ्याला मारहाण करणाऱ्या खासदाराचा भाजप बचाव का करत आहे ? असा सवाल देखील त्यांनी विचारला आहे. संरक्षण मंत्री सोनू महाजन यांच्या कुटुंबाला कधी फोन करणार व न्याय मिळेल याचे आश्वासन देणार ? खासदार असल्याने पोलिसांनी कोणालाही अटक देखील केलेले नाही. आम्ही हे प्रकरण महाविकास आघाडी समोर मांडू, असेही ते म्हणाली.