मुंबई : हिंदू असेल, तर तो देशभक्त असायलाच हवा. कुणीही हिंदू भारत विरोधी असू शकत नाही, असे मत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी व्यक्त केल्यानंतर आता ‘हिंदू’च्या मुद्यावरून टीका टिप्पणी सुरू झाली आहे.
मोहन भागवतांच्या या वक्तव्यानंतर एमआयएमचे खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी गाधीजींची हत्य करणाऱ्या गोडसेबाबत काय विचार आहे ?, असा सवाल मोहन भागवतांना केला आहे. त्यानंतर काँग्रेसने देखील भागवतांच्या या वक्तव्यावर मत मांडले आहे.
हिंदू देशभक्तच आहेत केवळ संघाचे किंवा संघाशी संबंधित सोडून…..
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) January 2, 2021
‘हिंदू देशभक्तच आहेत, केवळ संघाचे किंवा संघाशी संबंधित सोडून’, असा टोला काँग्रेस नेते सचिन सांवत यांनी मोहन भागवत आणि संघाला लगावला आहे.
दरम्यान, हिंदू असेल, तर तो देशभक्त असायलाच हवा. कारण ते त्याच्या मुळातच आहे. तो झोपलेला असू शकतो, त्याला उभे करावे लागेल. मात्र, कुणीही हिंदू भारत विरोधी असू शकत नाही, असे मत भागवत यांनी ‘मेकिंग ऑफ अ हिंदू पेट्रियॉट- बॅकग्राउंड ऑफ गांधीजीज हिंद स्वराज’ नावाच्या इंग्रजी पुस्तकाच्या विमोचन कार्यक्रमात बोलताना व्यक्त केले होते.