मुंबई : मुंबई क्रूझ ड्रग्स प्रकरण आणि आर्यन खान याच्या अटकेप्रकरणी आता मुंबई नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे झोनल संचालक समीर वानखेडे यांच्यावर एका निनावी पत्राद्वारे एनसीबीच्या अधिकाऱ्याने अत्यंत गंभीर स्वरुपाचे आरोप केले आहेत. एनसीबीच्या अधिकाऱ्याचं हे निनावी पत्र राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री नवाब मलिक यांनी ट्वीट केलं आहे. ज्यामध्ये अत्यंत धक्कादायक अशा गोष्टी नावांसकट सांगण्यात आल्या आहेत.
समीर वानखेडे १०० टक्के मुस्लीमच आहे, हिंदू नाही; मंत्री नवाब मलिकांचा खळबळजनक दावा
‘बॉलिवूडमधील कलाकारांवर खोट्या केसेस टाकून त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची वसुली समीर वानखेडे आणि त्यांची टीम करते. एवढेच नव्हे तर समीर वानखेडे लोकांच्या घरात ड्रग्स देखील प्लांट करतात आणि खोट्या केसेस तयार करतात.’ असे गंभीर आरोप या पत्रातून करण्यात आले आहेत.
नेमकं काय म्हटलं पत्रात?
मी एनसीबीचा एक कर्मचारी आहे. मागील दोन वर्षापासून मुंबई कार्यालयात कार्यरत आहे. मागील वर्षी एनसीबीला सुशांत सिंह राजपूत प्रकरणी ड्रग अँगलची चौकशी सोपविण्यात आली आणि माजी महासंचालक श्री. राकेश अस्थाना यांनी एसआयटीचं गठन करुन आपला चेला कमल प्रीत सिंह मल्होत्रा यांना एसआयटीचं प्रभारी बनवून मुंबईमध्ये ड्रग अँगलची चौकशी सोपवली आणि सोबत समीर वानखेडे जे (DRI) मुंबईमध्ये काम करत होते त्यांना गृहमंत्री अमित शाह यांना सांगून नियमबाह्य पद्धतीने डीआरआयने लोन बेसिसवर एनसीबी मुंबईमध्ये झोनल डायरेक्टर पदावर नियुक्त केलं.
राकेश अस्थाना जे सर्वांनाच माहिती आहेत की, ते किती इमानदार अधिकारी आहेत, त्यांनी समीर वानखेडे आणि केपीएस मल्होत्रा यांना साम, दाम, दंड आणि इतर कोणत्याही मार्गाने बॉलिवूडच्या कलाकारांना ड्रग प्रकरणात अडकवून त्यांच्याविरोधात केस तयार करण्याचे आदेश दिले.केस दाखल केल्यानंतर केपीएस मल्होत्रा आणि समीर वानखेडे यांनी या कलाकारांकडून कोट्यवधी रुपयांची मागणी केली आणि कोट्यवधी रुपये उकळून राकेश अस्थाना यांना देखील त्यातील काही हिस्सा दिला.बॉलिवूडच्या या कलाकारांकडून (दीपिका पदुकोण, करिश्मा प्रकार, श्रद्धा कपूर, रकूल प्रीत सिंह, सारा अली खान, भारती सिंह, हर्ष लिम्बाचिया, रिया चक्रवर्ती, शोविक चक्रवर्ती आणि अर्जुन रामपाल) सगळे पैसे त्यांचे वकील अयाज खान यांनी गोळा करुन दिले.
अयाज खान यांची मैत्री समीर वानखेडेंशी आहे. ते एनसीबी कार्यालयात कधीही येऊ-जाऊ शकतात. त्यांना कोणीही अडवू शकत नाही. ते समीर वानखेडेला बॉलिवूडकडून दर महिन्याला वसूली करुन देतो. तसंच जेव्हा समीर वानखेडे एखाद्या बॉलिवूड कलाकाराला पकडतो तेव्हा तो त्यांना अयाज खान याला आपला वकील म्हणून नेमण्यास सांगतो. समीर वानखेडे हे एक अटेन्शन सीकर अधिकारी आहेत. त्यांना नेहमी मीडियामध्ये आपल्या बातम्या हव्या असतात. ज्यासाठी त्यांना अनेक निर्दोष लोकांना खोट्या NDPS केसेसमध्ये अडकवलं आहे.
Here are the contents of the letter received by me from an unnamed NCB official.
As a responsible citizen I will be forwarding this letter to DG Narcotics requesting him to include this letter in the investigation being conducted on Sameer Wankhede pic.twitter.com/SOClI3ntAn— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) October 26, 2021
खोट्या केसेस बनविण्यासाठी समीरने आपली एक वेगळी टीम बनवली आहे ज्यामध्ये सुप्रिटेंडंट विश्व विजय सिंह, आयओ आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी. जिआयओ सुधाकर शिंदे, ओटीसी कदम, शिपाई रेड्डी, पी. डी. मोरे आणि विष्णू मीना, यूडीसी सूरज, ड्रायव्हर विजय, अनिल माने आणि समीरचे खासगी सचिव शरद कुमार यांचा समावेश आहे. OTC कदम, शिपाई रेड्डी, पी. डी. मोरे आणि विष्णू मीना, ड्रायव्हर अनिल माने हे सर्व जण कोणत्याही घरात ड्रग्स ठेवायचे आणि मग त्यांच्याविरोधात खोट्या केसेस तयार करायचे. काही ठिकाणी हे ड्रग्सचं प्रमाण वाढवून त्यांना कमर्शियल कॉन्टेटी असल्याचे देखील दाखवायचे. जेणेकरुन संबंधित व्यक्तीला जामीन मिळू नये.
याशिवाय आशिष रंजन, किरण बाबू, विश्वनाथ तिवारी आणि सुधाकर शिंदे हे नकली पंचनामे तयार करतात. हे पंचनामे एनसीबी कार्यालयात लिहले जातात. वानखेडे हा आपल्या काही खास लोकांच्या मदतीने ड्रग्स खरेदी करुन नंतर खोट्या केसेस बनवायचा. त्याच्या या खास माणसांचं नाव दशरथ, जमील, अफजल, मोहम्मद, शेख, नासिर, आदिल उस्मानी अशी आहेत. जे केवळ समीरलाच ड्रग्स पुरवतात. जे खरेदी करण्यासाठी समीर सीक्रेट सर्विस फंड आणि लोकांच्या घरी तपासणीदरम्यान लुटलेल्या पैशांचा वापर करतो. इथे मी आपल्याला काही केसेसबाबत माहिती देतो ज्यामध्ये समीर आणि त्याची टीम कशाप्रकारे लोकांच्या घरावर धाडी मारुन छाप्यादरम्यान, ड्रग्स ठेवून खोट्या केसेस तयार करतात. असं म्हणून किमान 26 केसेसचा या पत्रात उल्लेख करण्यात आला आहे.
Read Also :
- बायको-सासुबरोबर जेलमध्ये जायचं का? प्रकाश आंबेडकरांची अशोक चव्हाणांना धमकी
- महापालिका रणधुमाळी २०२२: विद्यमान नगसेवकांना प्रभाग रचनेचा धसका; सोईस्कर प्रभागासाठी रस्सीखेच
- शिवसेनेते असताना मी पक्ष मोठा केला, तेव्हा संजय राऊत खासदारही नव्हते; भुजबळांचा पटलवार
- एकनाथ खडसे यांना मोठा दिलासा; भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी न्यायालयाकडून अंतरिम जामीन मंजूर
- बिबवेवाडीतील हत्याकांडासारख्या घटना रोखण्यासाठी कायद्याचा धाक हवा – चंद्रकांत पाटील