पुणे : मराठा आरक्षणासंदर्भात मनोज जरांगे पाटलांच्या सर्व मागण्या सरकारने मान्य केल्या आहेत. परंतु यावर ओबीसी नेते आणि मंत्री छगन भुजबळ यांनी आक्षेप नोंदवला आहे. त्यावर भुजबळ सरकारमध्ये राहून मुख्यमंत्र्यांना विरोध करत असतील तर मराठा समाजाच्या विरोधात भूमिका घेत असतील तर माझं मुख्यमंत्र्यांना आवाहन आहे की, भुजबळांना कमरेत लाथ घालून सरकारमधून बाहेर काढा. असे विधान शिंदे गटातील आमदार संजय गायकवाड यांनी केले आहे. त्यावर आता अजित पवार गटाकडून संजय गायकवाड यांना जोरदार प्रत्युत्तर देण्यात येत आहे.
हेही वाचा…“भारताचा अमृतकाळ हा मोदी सरकारसाठी कर्तव्यकाळ”, सुनील देवधर यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
संजय गायकवाड यांना अशी वक्तव्य करायला रोखलं पाहिजे. अन्यथा त्यांचे पाय उखडून टाकायला आमचे कार्यकर्ते खंबीर आहेत. छगन भुजबळ हे कशाला पाहिजे? तुम्हाला जशास तसं उत्तर मिळेल. तु आमदार तुझ्या घरी. बोलताना नीट बोललं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी पेकाटात लाथ घालून हाकलून दिलं पाहिजे. अन्यथा सत्तेतील कुस्ती लोकांना पाहायला मिळेल. अशी टिका राष्ट्रवादीच्या उपनेत्या रूपाली पाटील यांनी केली आहे.
हेही वाचा…“विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प”, केंद्रीय अर्थसंकल्पावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
दरम्यान, छगन भुजबळ यांना संजय गायकवाड यांनी शिव्या दिल्याचीही एक ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. त्यावरून जर संजय गायकवाड यांनी शिव्या दिल्या असतील तर डबल शिव्या द्या. असा सल्ला देखील रूपाली पाटील यांनी कार्यकर्त्यांना दिला. संजय गायकवाडांचे वक्तव्य संतापजनक आहे. त्यांचे वक्तव्य चुकीचं आहे. गायकवाडांना भावना मांडण्याचा अधिकार आहे. पण गायकवाडांची भाषा योग्य नाही. मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यांनी दखल घेऊन कारवाई करावी. असे सुनील तटकरे यांनी केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आम्हाला न्याय आणि समान वागणूक का दिली जात नाही ?” पुण्याच्या नवीन विमानतळावरून ठाकरेंचा सवाल
हेही वाचा…“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रगतीशील धोरणांतुन देशाच्या विकासाला चालना”, डॉ. नीलम गोऱ्हे
हेही वाचा…“लाखांत नाही तर कोटीत निधी आणतो, तुमच्यासारखं दाळ व गुळवाल्यांच्या..,” निलेश लंकेंचा विखेंना अप्रत्यक्ष टोला
हेही वाचा…“देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, देशाचा अंतरिम अर्थसंकल्प”, अजित पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, देशाचा अंतरिम अर्थसंकल्प”, अजित पवारांची प्रतिक्रिया