अहमदनगर : गेल्या काही दिवसापासून राज्यात महायुतीत जागावाटपावरून धुसफूस सुरू झाली आहे. यातच अजित पवार सत्तेत सामील झाल्याने अनेक भाजपच्या नेत्याना अडचण निर्माण झाली आहे. यातच नगरमधील राजकीय वातावरण चर्चेत आलं आहे. खासदार सुजय विखे पाटील आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार निलेश लंके यांच्यात टिका टिप्पणी सातत्याने सुरू आहे. यातच आता मी लाखांत नव्हे तर कोटी रूपयात निधी आणला आहे. मी स्वत: दहा पाच लाख रूपयांच्या कामांचे उद्धाटन करत नाही. माझे कार्यकर्तेच करतात. असा टोला निलेश लंके यांनी विखे पाटलांना लगावला आहे.
हेही वाचा…रोहित पवारांची दुसऱ्यांदा ईडीकडून चौकशी, तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांना ‘त्या’ प्रकरणात पुन्हा क्लीनचीट, रोहित पवार म्हणाले…
पारनेर तालुक्यातील निघोज याठिकाणी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आलं होतं. या कार्यक्रमात निलेश लंके यांनी सुजय विखे पाटलांवर जोरदार टिकास्त्र सोडलं आहे. मी जे बोलतो, तेच करतो. खासदारांनी तालुक्याला खासदार निधीतून काय दिले ते त्यांनी सांगावे. त्यांनी जी कामे केली, ती सर्व जिल्हा परिषदेच्या निधीतून केली आहे. मी माझ्या कामांचा आमदार निधीची लेखाजोगा मांडतो. मी कधीही समोरासमोर चर्चेला तयार आहे. असेही ते म्हणाले.
हेही वाचा…“रायगडमध्ये यावेळी मोदींविरोधात त्सुनामी सारखं मतदान होणार”, ठाकरेंनी सुनील तटकरेंना दिलं आव्हान
दरम्यान, आताच्या अवघ्या दीड वर्षात पारनेर तालुक्यातील विकास कामांसाठी विविध विभागातून १७०० कोटी रूपयांचा निधी मंजूर करून घेतला. मी लाखांत नव्हे तर कोटीत निधी आणला आहे. मी स्वत: दहा पाच लाख रूपयांच्या कामांचे उद्घाटन करत नाही. तर कार्यकर्त्यांना करायला सांगतो. त्यामुळे जनतेने दाळ व गुळवाल्यांच्या नादी लागून आमिषाला पडू नका . आतापर्यंत निघोजमध्ये ७० कोटी रूपयांची विकास कामे केली असून आगामी काळातही विकास कामे करत राहणार आहे. असेही त्यांनी सांगितले.
READ ALSO :
हेही वाचा…“देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, देशाचा अंतरिम अर्थसंकल्प”, अजित पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“देशासह महाराष्ट्राच्या विकासाला चालना देणारा, देशाचा अंतरिम अर्थसंकल्प”, अजित पवारांची प्रतिक्रिया
हेही वाचा…“भारताचा अमृतकाळ हा मोदी सरकारसाठी कर्तव्यकाळ”, सुनील देवधर यांची अर्थसंकल्पावर प्रतिक्रिया
हेही वाचा…“विकसित भारताचा संकल्प सांगणारा अर्थसंकल्प”, केंद्रीय अर्थसंकल्पावर फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले..
हेही वाचा…“शरद पवार सदस्य नसतील तर मग राष्ट्रवादीची स्थापना कोणी केली?” सभागृहात जोरदार युक्तिवाद