रायगड : केंद्र सरकारने एक पैसा दिलेला नसतानाही तौक्ते आणि निसर्ग चक्रीवादळात मुख्यमंत्री असतांना मी माझ्या कोकणवासियांसोबत होतो. पण संकट आल्यावर मोदी महाराष्ट्रात फिरकत सुद्धा नाहीत. असं म्हणत कुणाचीही तुलना जर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांसोबत केली जात असेल तर ती तुलना करणारी माणसं निबुर्ध आहेत. रायगडमधून निवडून आला तो मोदी लाटेत वाहून गेला. पण माझा रायगड तसाच आहे. रायगडकरांना मी धन्यवाद देतो. मागच्या निवडणुकीत रायगडकर मोदी लाटेत वाहून गेले नाहीत. आजही रायगडकर ताठ मानेने उभे आहेत. रायगडमध्ये यावेळी सुद्धा मोदींविरोधात त्सुनामी सारखं मतदान होणार असं माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. आज रायगडमध्ये ठाकरेंची जाहीर सभा पार पडली. यावेळी त्यांनी विद्यमान खासदार सुनील तटकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
हेही वाचा…मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक, झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप
आज एका वर्तनामा पत्रात दोन बातम्या वाचल्या. एका बाजूला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांना अटक तर दुसऱ्या बाजूला अजित पवार यांना क्लिन चिट. भ्रष्टाचार करा अन् भाजपात या. काही होणार नाही. मोदी गॅरंटी आहे. असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपवर जोरदार टिका केली. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री पद मिळेल. मग आरोप आणि क्लिनचीट देणारे हेच आहेत. नितीश कुमार भाजपात गेल्यावर लगेचच लालु प्रसाद यादव यांना इडीचे समन्स. या सगळ्या गॅंरट्या तुम्हाला परवडणार आहे का ? असा सवाल देखील त्यांनी केला.
हेही वाचा…“तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कदापि माफ करणार नाहीत”, भुजबळांनी ओबीसींना केलं मोठे आवाहन
आपली लढाई लोकशाही विरूद्ध हुकूमशाहीच्या विरोधात आहे. तुम्ही ज्यांच्या सतरंज्या उचलत आहात. त्यांच्या हातात तुम्ही देश देत असाल तर तुम्ही हुकूमशाहीच्या हातात देश देत आहात. त्यामुळे पुढच्या पिढ्या तुम्हाला माफ करणार नाहीत. असं म्हणत ठाकरेंनी भाजप समर्थकांना देखील टोला लगावला. मला पंतप्रधान पदाचं स्वप्न पडत नाहीत. मला फक्त देश स्वातंत्र्य करण्याचे स्वप्न पडत आहे. तुमचं मत तुमच्या पुढील पिढ्यांसाठी देणार आहेत. त्यामुळे तुम्ही इंडिया आघाडीला मत द्या. असेही ठाकरे यांनी म्हटले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“३० गद्दार माजी नगरसेवकांना प्रत्येकी ५ कोटी रूपये विकासनिधी,” ठाकरे गटाची जोरदार टिका
हेही वाचा…गृहमंत्री फडणवीसांचा पुण्यात ‘नवा नागपुर पॅटर्न’, अजित पवारांना पुण्यात धक्का ?
हेही वाचा…कुख्यात गुंड शरद मोहोळचा मुख्य मारेकरी अखेर अटकेत, नाशिक रोडवर पाठलाग करत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा…“आमच्यावर शिंतोडे उडवण्याचे काही ‘इंसेंटिव्ह’ जाहीर केले आहे का शेठजींनी,”? दानवेंचा शेलारांचा खोचक सवाल
हेही वाचा…सोलापुर अन् धुळ्यात एकाच वेळी ठाकरे गटाचं मोठं नुकसान, असंख्य पदाधिकारी शिंदे गटात दाखल