मुंबई : सोलापुर जिल्ह्यातील माढा तालुक्यातील कुर्डुवाडी नगर परिषदेतील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे सहा माजी नगरसेवकांनी शिंदे गटात प्रवेश केला आहे. त्यामुळे ठाकरे गटाला याचा मोठा फटका बसण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तर दुसऱ्या बाजूला धुळे जिल्ह्यातील साक्री तालुक्यातील शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे दोन माजी नगरसेवकांनी देखील शिंदेंची वाट धरल्याने जिल्ह्यात ठाकरे गटाचं मोठं नुकसान झालं आहे.
हेही वाचा…“महाराष्ट्रात एकाच वेळी तब्बल १३० पीआयच्या बदल्या, आम आदमा पार्टीने उपस्थित केली शंका”
आगामी लोकसभा तसेच विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन अनेक जण पक्ष प्रवेश करतांना दिसत आहेत. यातच सोलापुर आणि धुळे जिल्ह्यातील माजी नगरसेवकांनी शिंदेंची वाट धरली आहे. यामध्ये सोलापुरमधील नगरसेवक अरविंद पवार, युसुफ दाढवाले, लतीफ मुलाणी, संभाजी सातव, संजय माळी, संजय खोत, संजय साठे, सतीश इंगळे, रोहित सोलणकर, सुमित तांबट, प्रतीक गावडे, तुषार वाघ, प्रतीक पाटील तर साक्री येथील नगरसेवक नगरसेवक पंकज मराठे, मुकेश शिंदे, राजधर देसले, अजय सूर्यवंशी, सोनू मारनर, प्रमोद अहिरराव, पंकज गवळी अजय जाधव, साहेबराव बोरकर , जितेंद्र खैरणार, समाधान याईस, व्यंकट नेरे, निखिल अहिरराव यांचा समावेश आहे.
हेही वाचा…राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली की नाही ? कॉंग्रेसकडून या घटनेचा मोठा खुलासा
दरम्यान, यावेळी यावेळी शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी आणि सोलापूर जिल्ह्याचे संपर्क प्रमुख शिवाजी सावंत आणि पक्षाचे इतर सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते. दोन माजी नगरसेवक, तीन पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंच आणि पक्ष पदाधिकारी तसेच कार्यकर्त्यांनी वर्षा या निवासस्थानी येऊन शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.
READ ALSO :
हेही वाचा…मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक, झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप
हेही वाचा…“तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कदापि माफ करणार नाहीत”, भुजबळांनी ओबीसींना केलं मोठे आवाहन
हेही वाचा…अजित पवार गटाने केली १४ प्रवत्यांची नियुक्ती, मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील तर अमोल मिटकरी..
हेही वाचा“महाविकास आघाडीत अद्यापही वंचितचा समावेश झाला नाही,” प्रकाश आंबेडकर म्हणाले…
हेही वाचा…“पहिला मानाचा “शिवसन्मान पुरस्कार” भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घोषित”, 19 फेब्रुवारीला मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर