पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात दौरे वाढले आहे. मुंबई, नाशिक, पुणे, सोलापुर नंतर आता पुन्हा पुणे दौऱ्यावर नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारी रोजी येणार आहेत. या दौऱ्यात लोहगाव विमानतळावरील नव्या टर्मिनलचे उद्घाटन, रूबी हॉल ते रामवाडी या मेट्रो मार्गास हिरवा झेंडा दाखविण्यासह पिंपरी ते निगडी या नवीन मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील केले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…“आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या,” राहुल कनालचं संजय राऊतांना आव्हान
पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने महाराष्ट्रात येत आहेत. यातच आता १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत असून विविध विकासकामांचं भूमिपुजन, लोकार्पण देखील होणार आहे. तर पुण्याच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवनेरी किल्ल्यावरही जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मागील दोन महिन्यात महाराष्ट्रात मुंबई, नाशिक आणि सोलापुरनंतर पुण्यातला चौथा दौरा आहे.
हेही वाचा…सत्ताधारी आमदारांनाच विकासनिधी, मुंबई महापालिकेचा अजब कारभावर, आव्हाडांचा सरकारवर संताप
दरम्यान, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून आणि तमाम शिवभक्तांच्या वतीने देण्यात येणारा पहिला मानाचा “शिवसन्मान पुरस्कार” भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना घोषित झाला आहे. साताऱ्यातील सैनिक स्कूलच्या भव्य मैदानावर १९ फेब्रुवारी २०२४ रोजी शिवजयंती दिनी गौरवपूर्ण प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाचे श्रीमंत छत्रपती खासदार उदयनराजे भोसले निमंत्रक आहेत. यंदाच्या वर्षापासून हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“महाराष्ट्रात एकाच वेळी तब्बल १३० पीआयच्या बदल्या, आम आदमा पार्टीने उपस्थित केली शंका”
हेही वाचा…राहुल गांधींच्या गाडीवर दगडफेक झाली की नाही ? कॉंग्रेसकडून या घटनेचा मोठा खुलासा
हेही वाचा…“विरोधकांचा सूड घेण्याच्या नादात सत्ताधारी मुंबईकरांवर सूड कशाला उगवताहेत ?”
हेही वाचा.आमदार अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची हजेरी
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा पुणे दौरा, नरेंद्र मोदींना यंदाचा ‘शिव पुरस्कार’ जाहीर