मुंबई : दोन वर्षापासून महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने ४ फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर १६ फेब्रुवारी २०२३ रोजी शहरातील विकासकामांसाठी ३६आमदारांमार्फत निधी खर्च करण्याचा ठराव करण्यात आला. त्यानुसार आमदारांना विकास निधी वाटप करण्यात आला आहे. परंतु सत्ताधारी पक्षाच्या आमदारांना भरभरून निधीवाटप करण्यात आले तर विरोधी पक्षातील एकाही आमदाराला निधी न दिल्यावरून एकच वाद निर्माण झाला आहे. त्याच पार्श्वभूमीवर राज्याचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा..मोठी बातमी..! मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात कोर्टात पहिली याचिका दाखल, जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य, पण..
राज्याच्या सरकारी तिजोरीतील निधी हा काही सत्ताधाऱ्यांच्या राजकीय पक्षाचा निधी आणि खासगी मालमत्ता नाही. असे असताना विरोधी पक्षातील आमदारांना निधीचे वाटप का होत नाही ? सरकार आणि प्रशासन हे फक्त सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात काम करणार का? विरोधकांच्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न हे सरकारचे प्रश्न नाहीत? विरोधकांचा सूड घेण्याच्या नादात सत्ताधारी भाजप आणि शिंदे सरकार मुंबईकरांवर कशाला सूड उगवत आहे. असा हल्लाबोल देखील वडेट्टीवार यांनी केला आहे.
हेही वाचा….महाविकास आघाडीचा युतीचा प्रस्ताव वंचिने स्विकारला, लोकसभा निवडणूक महायुतीला जड जाणार ?
दरम्यान, मुंबईतील ३६ आमदारांपैकी २१ आमदार सत्ताधारी भाजप-शिवसेना शिंदे गटाचे. तर १५ आमदार विरोधी पक्षांचे आहेत. महापालिकेत प्रशासकीय राजवट असल्याने आमदारांना नागरी कामांसाठी निधी उपलब्ध करण्याबाबतचा ठराव प्रशासनाने फेब्रवारी महिन्यात मांडला . परंतु यात सत्ताधारी आमदारांनाच निधी देण्यात आल्याने राज्य सरकारवर एकच टिका करण्यात येत आहे.
राज्याच्या सरकारी तिजोरीतील निधी हा काही सत्ताधाऱ्यांच्या राजकीय पक्षाचा निधी आणि खासगी मालमत्ता नाही.
असे असताना विरोधी पक्षातील आमदारांना निधीचे वाटप का होत नाही ?सरकार आणि प्रशासन हे फक्त सत्ताधाऱ्यांच्या मतदारसंघात काम करणार का?
विरोधकांच्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न हे… pic.twitter.com/YO55hHT11P
— Vijay Wadettiwar (@VijayWadettiwar) January 31, 2024
READ ALSO :
हेही वाचा.आमदार अनिल बाबर यांच्यावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार, मुख्यमंत्र्यांसह अनेक मंत्र्यांची हजेरी
हेही वाचा…पंतप्रधान नरेंद्र मोदींचा पुन्हा पुणे दौरा, नरेंद्र मोदींना यंदाचा ‘शिव पुरस्कार’ जाहीर
हेही वाचा…“आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या,” राहुल कनालचं संजय राऊतांना आव्हान
हेही वाचा…सत्ताधारी आमदारांनाच विकासनिधी, मुंबई महापालिकेचा अजब कारभावर, आव्हाडांचा सरकारवर संताप
हेही वाचा…जळगावात शरद पवार गटाला मोठे खिंडार..! शरद पवारांचा ‘हा’ खंदा शिलेदार असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात