पुणे : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे महाराष्ट्रात दौरे वाढले आहे. मुंबई, नाशिक, पुणे, सोलापुर नंतर आता पुन्हा पुणे दौऱ्यावर नरेंद्र मोदी १९ फेब्रुवारी रोजी येणार आहेत. या दौऱ्यात लोहगाव विमानतळावरील नव्या टर्मिनलचे उद्घाटन, रूबी हॉल ते रामवाडी या मेट्रो मार्गास हिरवा झेंडा दाखविण्यासह पिंपरी ते निगडी या नवीन मेट्रो मार्गाचे भूमिपूजन देखील केले जाण्याची शक्यता आहे.
हेही वाचा…पाणीदार आमदार अनिल बाबर यांचं निधन, एकनाथ शिंदेंचे अत्यंत विश्वासू, चार वेळा आमदार
पुढील निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने महाराष्ट्रात येत आहेत. यातच आता १९ फेब्रुवारी रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी पुण्यात येत असून विविध विकासकामांचं भूमिपुजन, लोकार्पण देखील होणार आहे. तर पुण्याच्या दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे शिवनेरी किल्ल्यावरही जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा मागील दोन महिन्यात महाराष्ट्रात मुंबई, नाशिक आणि सोलापुरनंतर पुण्यातला चौथा दौरा आहे.
हेही वाचा…मोठी बातमी..! लोकसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीला जोडले चौथे इंजिन, वंचितच्या युतीवर शिक्कामोर्तेब
दरम्यान, श्रीमंत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घराण्यातून देण्यात येणारा मानाचा शिव सन्मान पुरस्कार हा भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना जाहीर करण्यात आला आहे. येत्या 19 फेब्रुवारीला सैनिक स्कूल ग्राउंड सातारा येथे भव्य दिव्य असा हा सोहळा पार पडणार आहे. छत्रपती खासदार उदयनराजे भोसले निमंत्रक असून त्यांनी तशा पद्धतीची घोषणा देखील केली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आरोप सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या,” राहुल कनालचं संजय राऊतांना आव्हान
हेही वाचा…सत्ताधारी आमदारांनाच विकासनिधी, मुंबई महापालिकेचा अजब कारभावर, आव्हाडांचा सरकारवर संताप
हेही वाचा…जळगावात शरद पवार गटाला मोठे खिंडार..! शरद पवारांचा ‘हा’ खंदा शिलेदार असंख्य कार्यकर्त्यांसह भाजपात
हेही वाचा..मोठी बातमी..! मराठा आरक्षणाबाबत काढलेल्या अध्यादेशाच्या विरोधात कोर्टात पहिली याचिका दाखल, जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य, पण..
हेही वाचा….महाविकास आघाडीचा युतीचा प्रस्ताव वंचिने स्विकारला, लोकसभा निवडणूक महायुतीला जड जाणार ?