पुणे : मागील काही दिवसापासून चर्चेत आलेल्या कुख्यात गुंड शरद मोहोळ हत्या प्रकरणाला वेगळं वळण लागलं आहे. शरद मोहोळ प्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याच्या पोलिसांनी नाशिक रोड वरून मुसक्या आवळ्याला आहेत. शरद मोहोळची हत्या करून काही दिवसापासून गणेश मारणे फरार होता. अखेर त्याला पकडण्यात पोलिसांना मोठे यश आले आहे.
हेही वाचा…“महाविकास आघाडीत अद्यापही वंचितचा समावेश झाला नाही,” प्रकाश आंबेडकर म्हणाले…
पुणे पोलिसांनी शरद मोहोळ हत्याप्रकरणातील मुख्य आरोपी गणेश मारणे याला नाशिक रोड येथून पाठलाग करत अटक केली आहे. आतापर्यंत या प्रकरणात मुख्य सुत्रधार गणेश मारणे, विठ्ठल शेलार याच्यासह १६ जणांवर मोक्का लावण्यात आला आहे. तर याप्रकरणात आतापर्यंत २० हून अधिकजणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. यामध्ये साहिल उर्फ मुन्ना संतोष पोळेकर, नामदेव महिपती कानगुडे, अमित उर्फ अमर मारूती कानगुडे, चंद्रकांत शाहू शेळके, विनायक संतोष गव्हाणकर, विठ्ठल किसन गांदले, अॅड. रवींद्र पवार, अॅड. संजय उडान. विठ्ठल शेलार, रामदास उर्फ वाघ्या मारणे, धनंजय मारूती वटकर, सतीश संजय शेगडे.नितीन अनंता खैरे, आदित्य विजय गोळे,संतोष दामोदर कुरपे यांना बेड्या ठोकण्यात आल्या आहेत.
हेही वाचा…“पहिला मानाचा “शिवसन्मान पुरस्कार” भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींना घोषित”, 19 फेब्रुवारीला मोदी महाराष्ट्र दौऱ्यावर
दरम्यान, कुख्यात गुंड शरद मोहोळ याची ५ जानेवारीला लग्नाच्या वाढदिवशीच गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. सुरूवातीला या प्रकरणात आठ जणांना पोलिसांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर याप्रकरणाचा अधिक तपास केला असता अनेक जण या जाळ्यात अडकल्याचे दिसून आले. तसेच आरोपींची साखळी मोठी असून अनेक जण अजूनही फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“आमच्यावर शिंतोडे उडवण्याचे काही ‘इंसेंटिव्ह’ जाहीर केले आहे का शेठजींनी,”? दानवेंचा शेलारांचा खोचक सवाल
हेही वाचा…सोलापुर अन् धुळ्यात एकाच वेळी ठाकरे गटाचं मोठं नुकसान, असंख्य पदाधिकारी शिंदे गटात दाखल
हेही वाचा…मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक, झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप
हेही वाचा…“तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कदापि माफ करणार नाहीत”, भुजबळांनी ओबीसींना केलं मोठे आवाहन
हेही वाचा…अजित पवार गटाने केली १४ प्रवत्यांची नियुक्ती, मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील तर अमोल मिटकरी..