पुणे : आगामी लोकसभा निवडणुकीच्या आधी महाराष्ट्रातील अधिकारांच्या पदांमध्ये मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. राज्यातील १७ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे अत्यंत जवळचे आणि नागपूरच्या इतिहासात सर्वाधिक काळ पोलीस आयुक्तपदी राहण्याचा विक्रम असणारे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्याचे नवे आयुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे. त्यामुळे राज्याच्या उपमुख्यमंत्री दुसऱ्या उपमुख्यमंत्र्यांना जोराचा झटका दिल्याची चर्चा राजकारणात सुरू झाली आहे.
हेही वाचा…अजित पवार गटाने केली १४ प्रवत्यांची नियुक्ती, मुख्य प्रवक्ते म्हणून उमेश पाटील तर अमोल मिटकरी..
निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राज्यातील ५९ वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांच्या गृहविभागाने बदल्या केल्या आहेत. पुण्याचे पोलिस आयुक्त रितेश कुमार यांची बदली प्रमोशनवर महासमादेशक, डीजी होमगार्ड म्हणून मुंबईत बदली केली आहे. तर त्यांच्या जागी देवेंद्र फडणवीस यांच्या मर्जीतील पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांची पुण्याच्या पुणे आयुक्तपदासाठी नियुक्ती करण्यात आली आहे. देवेंद्र फडणवीस यांनी निवडणुका तोंडावर असतांना आपल्या शहरातील आणि मर्जीतील अधिकारी पुण्यात आणला आहे. त्यामुळे हा पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांना मोठा धक्का मानला जात आहे. कारण ते पालकमंत्री असलेल्या जिल्ह्यात नागपुरहून पोलिस अधिकारी आणले जात आहेत.
हेही वाचा…“महाविकास आघाडीत अद्यापही वंचितचा समावेश झाला नाही,” प्रकाश आंबेडकर म्हणाले…
दरम्यान, कालच राज्यातील १३० पीआयच्या बदल्या देखील करण्यात आल्या आहेत. त्यात पिंपरी चिंचवडमधील वीस टक्के अधिकाही हे नागपुर येथून आणण्यात आले आहेत. या घाऊक बदल्यांत उद्योगनगरित बदल्या करण्यात आलेल्या २३ पैकी बहुतांश पीआय हे नागपुरहून आले असल्याने गृहमंत्री फडणवीसांचा हा नवा नागपूर पॅटर्न दिसून आला आहे.
READ ALSO :
हेही वाचा…कुख्यात गुंड शरद मोहोळचा मुख्य मारेकरी अखेर अटकेत, नाशिक रोडवर पाठलाग करत पोलिसांनी ठोकल्या बेड्या
हेही वाचा…“आमच्यावर शिंतोडे उडवण्याचे काही ‘इंसेंटिव्ह’ जाहीर केले आहे का शेठजींनी,”? दानवेंचा शेलारांचा खोचक सवाल
हेही वाचा…सोलापुर अन् धुळ्यात एकाच वेळी ठाकरे गटाचं मोठं नुकसान, असंख्य पदाधिकारी शिंदे गटात दाखल
हेही वाचा…मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिल्यानंतर हेमंत सोरेन यांना ईडीकडून अटक, झारखंडमध्ये मोठा राजकीय भूकंप
हेही वाचा…“तर येणाऱ्या पिढ्या आपल्याला कदापि माफ करणार नाहीत”, भुजबळांनी ओबीसींना केलं मोठे आवाहन