मुंबई : राष्ट्रवादी आमदार अपात्रता प्रकरणी अजित पवार गटाच्या वकिलांनी सुनावणीमध्ये महत्वाचा युक्तिवाद केला आहे. राष्ट्रवादी कार्यकारिणी सदस्यांची निवड घटनेनुसार झालेली नसून, शरद पवारांसह प्रफुल पटेल, सुनील तटकरे यांची नेमणूक न घेता झाल्याचा युक्तिवाद अजित पवार गटाचे वकील विरेंद्र तुळजापुकर यांनी केला. घटनेनुसार शरद पवार हे पक्षाचे सदस्या नाहीत मग अध्यक्ष कसे होऊ शकतात ? असा सवालही अजित पवार गटाच्या वकिलांनी केला. यावरून आता शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी यावरून संताप व्यक्त केला आहे.
हेही वाचा…“आमच्यावर शिंतोडे उडवण्याचे काही ‘इंसेंटिव्ह’ जाहीर केले आहे का शेठजींनी,”? दानवेंचा शेलारांचा खोचक सवाल
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीर गटाच्या म्हणण्यानुसार जर पवार साहेब पक्षाचे सदस्यच नसतील तर मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली? त्यांनी वेळोवेळी विविध पदांसाठी तुमच्या केलेल्या नेमणुका तेव्हा का नाकारल्या नाहीत? तुम्हाला वेळोवेळी निवडणुकांसाठी साहेबांच्या स्वाक्षरीने दिलेले एबी फॉर्म कसे ग्राह्य होते? असा सवाल करत सत्तेसाठी लाचारी करतांना व ती सत्ता टिकविण्याच्या भरात आपण काय युक्तिवाद करतोय, ते तरी आपल्या लक्षात येतेय का? असा संताप देखील त्यांनी व्यक्त केला.
हेही वाचा…सोलापुर अन् धुळ्यात एकाच वेळी ठाकरे गटाचं मोठं नुकसान, असंख्य पदाधिकारी शिंदे गटात दाखल
दरम्यान, हे तुम्हा सर्वांचे म्हणणे आहे की ती भाजपाची स्क्रीप्ट आहे? आणि जर तशा सूचना असतील तर मग बाहेरच्यांच्या सांगण्यावरुन घराचे वासे फिरविल्याचे सरळ मान्य का करीत नाहीत? ज्या माणसाने पक्ष स्थापन केला, तो वाढविला, अनेक नेत्यांना पदे दिली, सत्ता दिली, त्यांना मोठे केले, त्यांनाच पक्षाचे सदस्य नाहीत असे म्हणणे खरंच हास्यास्पद आहे. अहो युक्तिवादासाठी काही ठोस कारण नसल्याने असं काही तरी बाष्कळ बोलू नका, मिसरुड फुटलेले युवक सुद्धा तुमच्या बोलण्याला हसताहेत. असा टोला देखील त्यांनी लगावला.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या फुटीर गटाच्या म्हणण्यानुसार जर पवार साहेब पक्षाचे सदस्यच नसतील तर मग राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना कोणी केली? त्यांनी वेळोवेळी विविध पदांसाठी तुमच्या केलेल्या नेमणुका तेव्हा का नाकारल्या नाहीत? तुम्हाला वेळोवेळी निवडणुकांसाठी साहेबांच्या…
— Adv Rohini Eknathrao Khadse (@Rohini_khadse) February 1, 2024
READ ALSO :
हेही वाचा…रोहित पवारांची दुसऱ्यांदा ईडीकडून चौकशी, तर दुसऱ्या बाजूला अजित पवारांना ‘त्या’ प्रकरणात पुन्हा क्लीनचीट, रोहित पवार म्हणाले…
हेही वाचा…“रायगडमध्ये यावेळी मोदींविरोधात त्सुनामी सारखं मतदान होणार”, ठाकरेंनी सुनील तटकरेंना दिलं आव्हान
हेही वाचा…“३० गद्दार माजी नगरसेवकांना प्रत्येकी ५ कोटी रूपये विकासनिधी,” ठाकरे गटाची जोरदार टिका
हेही वाचा…गृहमंत्री फडणवीसांचा पुण्यात ‘नवा नागपुर पॅटर्न’, अजित पवारांना पुण्यात धक्का ?
हेही वाचा…कुख्यात गुंड शरद मोहोळचा मुख्य मारेकरी अखेर अटकेत, नाशिक रोडवर पाठलाग करत पोलिसांनी ठोकल्या बेड्या