मुंबई : शिवसेनेचे नेते आणि माजी मंत्री आदित्य ठाकरे बंडखोर आमदारांवर सातत्याने टिका करीत आहेत. आपल्या जाहीर भाषणांमधून ते बंडखोर आमदारांचा उल्लेख गद्दार म्हणून करीत आहेत. यावरून आता बंडखोर आमदार देखील आदित्य ठाकरे यांना प्रत्युत्तर देत आहेत. अशातच संजय शिरसाठ यांनी केलेल्या टिकेला शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे.
मनसेला एकनाथ शिंदेंनीच पाडलं मोठं खिंडार; 100 पदाधिकाऱ्यांचा मनसेला जय महाराष्ट्र
उठसूठ जे रोज आम्हाला गद्दार म्हणतात. त्यांचे फोटो लावून आम्ही बसायचे का? बाळासाहेब ठाकरे हे आमचे दैवत आहेत. आम्ही बंड केलेले नाही तर काॅंग्रेस- राष्ट्रवादीची सोबत नको म्हणून उठाव केला होता. पण तरीही आम्हाला गद्दार ठरवले जात असेल तर आम्ही फक्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांचेच फोटो लावू, आमच्या मनात आणि कार्यालयात देखील ते कायम राहतील असं संजय शिरसाठ यांनी म्हटलं होतं.
विनायक राऊत यांना आउट गोइंग माहीत नाही, त्यांना फक्त पैसे खायचे माहिती आहे म्हणून ते मुख्यमंत्र्यांवर अडणीपणाची टीका करीत आहेत. एसी कॅबिनमध्ये बसून तुम्ही सर्व ठरवा, पण राज्याचा मुख्यमंत्री लोकांमध्ये जाऊन काम करत असताना तुम्ही त्यांना अडाणी म्हणत असाल तर तुमच्या बुद्धीची कीव वाटते. असं म्हणत विनायक राऊत यांनी बंडखोर आमदारांवर निशाणा साधला आहे.
“गद्दारांच्या गाड्या फोडेल त्याचा शिवसेना प्रमुखांच्या हस्ते सत्कार केला जाईल”
इडीने ताब्यात घेतल्यानंतर उद्धव ठाकरे जसे राऊतांच्या कुटुंबियांना भेटायला गेले तसेच यशवंत जाधव, अडसुळ, प्रताप सरनाईक यांच्या घरी देखील त्यांनी जायला हवे होते. पण बहुदा संजय राऊत आता दोन चार वर्ष बाहेर येणार नाही, याची खात्री उद्धव ठाकरेंना वाटत असेल म्हणून ते राऊतांच्या घरी गेले असावेत असा टोला देखील त्यानी लगावला.
Read also
- “हे देखील पण दिवस लवकरच जातील”; प्रणिती शिंदें
- महाराष्ट्रातील सरकार म्हणजे ‘एक दूजे के लिए’ असे दोघांचेच सरकार
- इडी, सत्ताधीशवाले तुम्हाला एकतर तुरूंगात, नाहीतर मारून टाकतील; यशोमती ठाकुरांचा गंभीर आरोप
- एकटेच मुख्यमंत्री सर्व खात्यांना न्याय कसा देणार? अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना खोचक सवाल
- “रात्री दहानंतर लाऊडस्पीकर लावता कामा नयेत”; अजित पवारांचा मुख्यमंत्र्यांना रोखठोक इशारा