मुंबई : ठाकरे गट पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पाया पडणारे लोक आज मोदींबद्दल बोलत आहेत. मोदींच्या नखाची सुद्धा लायकी नसणारे लोक आज या भाषेत बोलतात. त्यावरून खऱ्या अर्थाने यांची लायकी कळते. मोदी कुठे आणि यांची लायकी कुठे ? असा सवाल करीत शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाठ यांनी उद्धव ठाकरे यांच्यासह संजय राऊतांवर हल्लाबोल केला आहे.
हेही वाचा…काॅंग्रेसची महत्वाची बैठकीत पुण्यातील आमदारांची दांडी, चर्चांना उधाण
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा जागतिक पातळीवर सन्मान केला जातो. हे टीनपाट लोक उठतात आणि मोदींबद्दल बोलू लागतात. नरेंद्र मोदी हे देशाचं नेतृत्व करतात, मोदींमध्ये जगाचं नेतृत्व करण्याची क्षमता आहे. परंतु, मला वाटतं लायकी नसलेले लोक अशी वक्तव्ये करत असतात. ज्या दिवशी माझी बोलायची वेळ येईल त्यावेळी मी या सर्वांना नग्न करून टाकेन, थोडं थांबा मला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी बोलू द्या, त्यांची परवानगी घेऊ द्या, मग यांच्याकडे पाहतो. असा इशाराही संजय शिरसाठ यांनी ठाकरेंना दिला आहे.
हेही वाचा…शिंदे गटाचा होणार भ्रमनिरास..! अजित पवार गटाला केंद्रात अन् राज्यात लागणार मंत्रीपदाची पुन्हा लॉटरी
दरम्यान, मागील काही दिवसांपासून ठाकरे आणि शिंदे गटात जोरदार शाब्दिक चकमक सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सगळ्याच राजकीय पक्षांनी तयारी सुरू आहे. त्यातच आता ठाकरे विरूद्ध शिंदे गट असा सामाना रंगण्याची शक्यता आहे.
READ ALSO :
हेही वाचा…“राज्यातील शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा,” ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी, अन् ‘या’ जिल्ह्यात तब्बल ३०९ कार्यकर्त्यांनी पवारांची साथ सोडली
हेही वाचा…“अजित पवार गटाकडून पवारांवर दुसऱ्यांदा केला गंभीर आरोप,” आयोगात जोरदार खडाजंगी
हेही वाचा…“पक्षावर एकच व्यक्ती वचर्स्व गाजवू शकत नाही”, अजित पवार गटाने आयोगात दिला ‘त्या’ प्रकरणाचा दाखला
हेही वाचा…शरद पवारांची मोठी खेळी, अजित पवारांचा एकेकाळचा कट्टर समर्थक शरद पवार गटात दाखल ?