पुणे : पुणे महापालिकेच्या प्रभाग क्रमांक १० (क) मधील ड्रेनेज लाईन, सांस्कृतीक हॉल यांसारख्या विकासकामांचे १० टेंडर महापालिका उपायुक्तांनी पात्र ठरवले होते. परंतू, ई-टेंडर पास करत असताना उर्वरित टेंडर सेल कर्मचाऱ्यांनी संगमताने १० पैकी ४ टेंडर अपात्र ठरवून घोटाळा केल्याचे प्रकार समोर आला आहे. त्यामुळे संबंधित टेंडर सेल कर्मचाऱ्यांची चौकशी करण्यात यावी, अशी मागणी जय श्री राम कन्ट्रक्शनचे ठेकेदार सुनिल चव्हाण यांनी केली आहे.
…तर भाजपाचा पराभव करणं सोप होईल; मुंबईत ममता बॅनर्जीने सांगितला ‘मास्टरप्लॅन’
प्रभाग क्रमांक १० (क) मधील रखडलेल्या विविध विकासकामांचे सुमारे १० लाख रुपयांचे १० टेंडर काढण्यात आले होते. १० पैकी १० टेंडर ब पाकिट उघडण्याच्या नमुना पत्रावर महापालिका उपायुक्तांनी पात्र ठरवले. त्यानंतर संबंधित टेंडर सेल कर्मचाऱ्यांनी ई-टेंडरवर ऑनलाईन नोंदणी करत असताना १० पैकी केवळ ६ टेंडरवर पात्र असल्याची नोंद केली. उर्वरित ४ टेंडरवर खाडाखोड करून “पात्र”च्या ठिकाणी “अपात्र” अशी नोंद केली.
शिवसेनेची ताकद वाढणार; वैभववाडीत अनेकांनी हाती बांधले शिवबंधन !
१० पैकी ६ टेंडर पात्र ठरले परंतू, एक ते दीड महिना उडटूनही ४ टेंडरबद्दल अधिकची माहिती मिळत नव्हती. त्यामुळे, जय श्री राम कंन्ट्रक्शनचे ठेकेदार सुनिल चव्हाण उपायुक्त कार्यलयात पोहोचले. त्यानंतर संबंधित टेंडर सेल कर्मचाऱ्यांशी याबद्दल विचारणा केली असताना कर्मचाऱ्यांनी उत्तरे देण्यात टाळाटाळ केली. त्यामुळे ठेकेदाराच्या डोक्यात संशयाचा भोवरा निर्माण झाल्यामुळे ई-वेबसाईटवर जावून पडताळणी केली असताना १० पैकी ६ पात्र आणि ४ अपात्र ठरवले असल्याचे दिसून आले. उपायुक्तांनी १० पैकी १० टेंडर पात्र ठरवले असताना ४ टेंडर अपात्र का ठरवण्यात आले? याचा जाब ठेकेदारांनी कर्मचाऱ्यांना विचारला. परंतू, कर्मचाऱ्यांनी उत्तर देण्याऐवजी ठेकेदारांसोबत अरेरावीची भाषा केली.
रत्नागिरी जिल्हा बँक अध्यक्षपदी डॉ. तानाजीराव चोरगे यांची वर्णी
त्यामुळे, उपायुक्तांनी पात्र ठरवले असताना टेंडर सेलच्या कर्मचाऱ्यांनी संगमताने अपात्र ठरवल्याचे समोर आले आहे. परंतू, महापालिका प्रशासनाने याकडे सर्रासपणे कानाडोळा करत आहे का? विकासकामांच्या टेंडरवर मलिदा खाण्यासाठी पात्र टेंडर अपात्र ठरवण्यात आले आहे का? महापालिका उपायुक्त टेंडर सेल कर्मचाऱ्यांना पाठीशी घालत आहेत का? असे प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यामुळे, संबंधित टेंडर सेलच्या कर्मचाऱ्यांनी कोणत्या आधारावर टेंडर अपात्र ठरवले, याची चौकशी करण्यात यावी, अन्यथा फौजदारी गुन्हा दाखल करू, अशी मागणी ठेकेदार सुनिल चव्हाण यांनी केली आहे.
Read Also :
- “माताजींच्या दौऱ्यात उद्योग हा केवळ बहाणा, मूळ उद्देश राजकीय”; फडणवीस यांचा दावा
- उल्हासनगरमध्ये भाजपाला मोठा धक्का; ९ बंडखोर नगरसेवकांच्या अपात्रतेची याचिका फेटाळली
- साहित्य संमेलनातील राजकीय नाट्यावर पडदा; भुजबळांच्या मध्यस्थीनंतर फडणवीस उपस्थित राहणार
- सुरेश म्हात्रे यांनी बांधले हातावर घड्याळ; अजित पवारांच्या उपस्थितीत पार पडला पक्षप्रवेश सोहळा
- कोरोना निर्बंधांबाबत अजित पवार यांचे मोठे वक्तव्य; परराज्यातून येणाऱ्यांसाठी आणि शाळांबद्दल म्हणाले…