पुणे : 1 फेब्रुवारीपासून पुण्यात शाळा सुरू होणार असल्याची माहिती पालकमंत्री अजित पवारांनी दिली. राज्यातील शाळा १९ जानेवारीपाून सुरू करण्यात आल्या. पुण्यातील कोरोना परिस्थिती नियंत्रणात आली नसल्याने शाळा सुरू करण्याचा निर्णय पुढे ढकलण्यात आला होता. मात्र, पालकमंत्री अजित पवार यांनी कोरोना आढावा बैठक घेऊन शाळा पुन्हा सुरू होणार असल्याचं सांगितलं.
जामीन नाकारला हा झटका नसून तो दिलासा आहे – निलेश राणे
यासाठी नव्याने नियमावली जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार पहिली ते आठवीची शाळा चार तास असणार आहे. तसेच राज्यातील महाविद्यालयं देखील येत्या 1 फेब्रुवारीपासून सुरू होणार असल्याची माहिती अजित पवार यांनी दिली. संबंधित नियमावली एका आठवड्यासाठी असणार असून ती पहिली ते आठवीसाठी लागू होणार असल्याचं पवार म्हणाले.
काय असेल नियमावली?
शाळांमध्ये पाठवण्याचा निर्णय संपूर्ण पालकांचा असणार
शाळेची वेळ फक्त चार तास – विद्यार्थ्यांनी नाश्ता करून यायचं, आणि त्यानंतर जेवण घरी जाऊन करायचं
मास्क काढायला लागेल अशा अॅक्टिव्हिटी टाळणार
पालकांनी विद्यार्थ्यांना मास्कचं बंधन करावं
९वीच्या शाळा पूर्णवेळ सुरू
८वी पर्यंतच्या शाळा चार तास भरवल्या जाणार
५० टक्के क्षमतेने शाळा सुरू होणार
रविवारी आणि सोमवारी शाळा सॅनिटाइज करण्यात याव्या
Read also:
- महाविकास आघाडी सरकारला आता जनताच निलंबित करणार; माजी मंत्री सदाभाऊ खोत यांचा इशारा
- किराणा दुकानात वाईन विकण्यास परवानगी; संभाजी भिडे म्हणतात… अफ्फू-गांजाच्या शेतीला…
- न्यायालयाचे दिलासे एकाचा राजकीय पक्षाला कसे मिळतात? शिवसेना नेते संजय राऊतांचा सवाल
- यांना काय कळतं शेतीतलं? चंद्रकांत पाटलांनी पुन्हा संजय राऊतांना डिवचलं
- कोरोनासोबत जगण्यासाठी नवीन नियमावली बनवायला हवी – आरोग्य मंत्री राजेश टोपे