मुंबई : गेल्या काही दिवसांपासून राज्याच्या राजकारणात राजकीय उलथापालथ होण्याची शक्यता दिसून येत आहे. सध्या महाराष्ट्रात महाविकास आघाडीचं सरकार आहे. मात्र, कॉंग्रेस सातत्याने आगामी निवडणुकींसाठी स्वबळाचा नारा देत आहे. त्यामुळे महाविकास आघाडीमध्ये बिघाडी होणार काय ? असे प्रश्न राजकीय वर्तुळातून आता उठू लागले आहेत. यातच आज शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत आणि भाजपचे मुंबईतील नेते आमदार आशिष शेलार यांच्यात आज मुंबईमध्ये गुप्तभेट झाल्याची बातमी समोर आली आहे. राज्य विधिमंडळाचे अधिवेशन पुढील आठवड्यात होणार आहे. या पार्श्वभूमीवर दोन्ही नेत्यांची ही भेट महत्वाची घडामोड मानली जात आहे.
“मुघलांनी सुद्धा वारकऱ्यांचे इतके हाल केले नव्हते, औरंगजेबापेक्षाही राज्यातलं सरकार अत्याचारी”
मुंबईतील नरिमन पॉईंट येथे ही गुप्तभेट झाली असून, संजय राऊत आणि आशिष शेलार यांच्यात सुमारे १ तास चर्चा झाल्याचा दावा करण्यात येत आहे. याआधी देखील आघाडी सरकारमधले महत्वाचे मंत्री आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी, मुख्यमंत्र्यांची वर्षावर भेट घेतली होती. दरम्यान, यावर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरकेर यांनी प्रतिक्रिया दिली असून, ‘भाजप कुणालाही ब्लॅकमेल करत नाही. आम्ही आमचं काम करत आहोत. भाजप हा सक्षम विरोधी पक्ष म्हणून काम करत आहे, शिवसेनेने हात पुढे केला तरी आम्ही विरोधातच राहणार’ असे त्यांनी स्पष्ट केले तसेच दोन नेते एकमेकांना भेटू शकतात, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे.
“बंडातात्या यांना झालेली अटक म्हणजे आघाडी सरकारकडून वारकऱ्यांची मुस्कटदाबी”
तसेच, गुप्त भेटींच्या बातम्या काही दिवसांपासून पाहतोय. गुप्त भेटींमध्ये संजय राऊत हे कॉमन आहेत. आशिष शेलार आणि संजय राऊत यांची भेट झालीय, असं म्हटलं जातेय पण ते नाकारत असतील तर त्यावर बोलणं संयुक्तिक नाही, असं प्रविण दरेकर म्हणाले. तर, भेट झाली असेल तर लपवायची गरज नाही, असं आशिष शेलार म्हणाले. चंद्रकांत पाटील यांनी अशा भेटी होत राहतात, असं म्हटलं.
Read Also :
- “फ्रान्सने सुरु केली आता भारतातही राफेल घोटाळ्याची संयुक्त संसदीय समितीमार्फत चौकशी करा”
- “पाच वर्षांत भाजपने काय मोठे दिवे लावले, चंद्रकांत पाटलांनी याचं उत्तर द्यावं”
- खनीजकर्म महामंडळांच्या टेंडर प्रक्रियेत घोटाळा? राष्ट्रवादीच्या नेत्याची ईडी आणि सीबीआय चौकशीची मागणी
- देशमुख दिल्लीत नाहीत आणि त्यांना ईडीडकडून समन्सही नाही! वकिलांनी केला खुलासा
- आमदार रवी राणांवर होणार कारवाई? उद्घाटन कार्यक्रमाला नियम पायदळी तुडवून केली तोबा गर्दी