औरंगाबाद : राज्याच्या हिवाळी अधिवेशनातही महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचा मुद्दा विरोधी पक्षांनी उचलून धरला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्रीय मंत्री अमित शहा यांची भेट घेतली. परंतु या बैठकीत काहीही झालं नाही. फक्त एकनाथ शिंदे यांनी अमित शहा यांच्यासोबत काॅफी पिऊन सोबत असल्याची खरमरीत टिका शिवसेनेचे माजी खासदार चंद्रकांत खैरे यांनी मुख्यमंत्र्यांवर केली आहे.
“भाजपच्या दृष्टीने सध्याचे मुख्यमंत्री क्रिकेटमधील नाईट वॉचमन”; काॅंग्रेसची जहरी टिका
महाराष्ट्रात शिंदे-भाजपचे सरकार असून केंद्रातही भाजपचेच सरकार आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्र्यांकडून या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची गरज होती. मात्र शिंदे आणि फडणवीस यांनी या भेटीत काय घडलं ते बाहेर येऊच दिलं नाही. मग हे धडाडीचे मुख्यमंत्री फक्त काॅफी पिऊन निघून गेले का ? असा सवाल खैरे यांनी केला आहे.
आई ती आईच असते..! राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे 2.5 वर्षाच्या बाळाला घेऊन विधानभवनात
बेळगाव-निपाणी कारवार, बिदरसह संयुक्त महाराष्ट्र झाला पाहिजे, अशी आमची मागणी होती. पण सोलापुर आणि सांगलीतल्या गावांवरही कर्नाटकने सांगितला आहे. हा वाद मुद्दाम उकरून काढला जातोय. कर्नाटक, महाराष्ट्र आणि केंद्रातील सरकार भाजपचं असताना हा मुद्दा वाढवला जात आहे. तिघांच्या बैठका झाल्या, पण त्यात काही बाहेर आलं नाही. त्यामुळे तिथे काहीतरी घडलं असेल अशी शंका देखील खैरे यांनी व्यक्त केली.
राजकारण तापलं..! “बोम्मई, ही सीमा हिंदुस्थानात आहे, पाकिस्तानात नाही” ; सेनेच्या नेत्याचा इशारा
दरम्यान, महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे पडसाद आज विधानभवनात देखील बघायला मिळाले. राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी बोम्मईंच्या ट्विटवरून प्रश्न उपस्थित केले होते. त्यावर उत्तर देतांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्यात जोरदार खडाजंगी बघायला मिळाली.
Read also
- “संजय राऊतांचा मेंदू बिघडला, त्यांची पक्षातील हकालपट्टी करा, अन्यथा..”
- “सीमावादावर राज्य सरकारची भूमिका नरमाई अन् बोटचेपीची”; अशोक चव्हाणांची टिका
- हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विविध आंदोलनांनी वेधलं लक्ष्य
- तुम्हाला मंत्रीपद हवं आहे का ? अन् फडणवीसांनी थेट सुनिल प्रभूला दिली ऑफर
- “कर्नाटक सरकारची दडपशाही सहन करणार नाही”; बेळगाव प्रवेशबंदीवरून अजित पवार संतापले