पुणे : महाराष्ट्राचं भविष्य केवळ देवेंद्र फडणवीसच बदलु शकतात. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांना 2024 मध्ये पुन्हा मुख्यमंत्री करू, तसेच जोपर्यंत भाजपच्या प्रदेशाध्यक्ष पदावर आहे, तोपर्यंत फडणवीस हे मुख्यमंत्री झालेच पाहिजे, असं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. त्यावर आता काॅंग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
सरकार आंधळ, बहिर, मुक,आणि पळकुट; महामोर्चात भुजबळांचा हल्लाबोल
राक्षसी सत्ताकांक्षा असलेल्या भाजपच्या पोटातील ओठांवर आले आहे. मुख्यमंत्रीपदाचा आम्हाला सन्मान आहे. पण खेदाने सांगावेसे वाटते की भाजप नेत्यांकडून सतत येणारी विधाने पाहिली तर भाजपच्या दृष्टीने सध्याचे मुख्यमंत्री क्रिकेटमधील नाईट वॉचमन आहेत. ही तात्पुरत्या स्वरूपाची व्यवस्था आहे, असा टोला सचिन सावंत यांनी भाजपला लगावला.
“फडणवीसांनी राज्यपाल अन् आपल्या सहकाऱ्यांच्या बुद्धीची तपासणी करावी”, सेनेचा टोला
महाराष्ट्राचं भविष्य केवळ देेवेंद्र फडणवीस बदलू शकतात. फडणवीस हे जाती-पातीच्या पलीकडे गेलेले नेते आहेत. 2024 मध्ये फडणवीसांना पुन्हा मुख्यमंत्री करू. असं चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटलं आहे. त्याचबरोबर किमान मी भाजपचा प्रदेशाध्यक्ष असेपर्यंत फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले पाहिजेत. असंही बावनकुळे यांनी बोलून दाखवलं.
“चंद्रकांत पाटलांनी घेतला शाई फेक प्रकरणाचा धसका, आता तोंडावर थेट फेसमास्क लावला”
त्यावर राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी देखील खोचक टिप्पणी केली आहे. ते म्हणाले की, एकनाथ शिंदे साहेब आता तरी जागे व्हा, दस्तुर खुद्द चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागपुरमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा व्यक्त केली आहे. अर्थ सोपा तुमचं नेतृत्व भाजपला मान्य नाही. जागे व्हा. असं म्हणत अमोल मिटकरी यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.
राक्षसी सत्ताकांक्षा असलेल्या भाजपाच्या पोटातील ओठांवर आले आहे. मुख्यमंत्रीपदाचा आम्हाला सन्मान आहे पण खेदाने सांगावेसे वाटते की भाजपा नेत्यांकडून सतत येणारी विधाने पाहिली तर भाजपाच्या दृष्टीने सध्याचे मुख्यमंत्री क्रिकेटमधील नाईट वॉचमन आहेत. ही तात्पुरत्या स्वरुपाची व्यवस्था आहे https://t.co/9g0VnTqmF1
— Sachin Sawant सचिन सावंत (@sachin_inc) December 19, 2022
Read also
- आई ती आईच असते..! राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे 2.5 वर्षाच्या बाळाला घेऊन विधानभवनात
- राजकारण तापलं..! “बोम्मई, ही सीमा हिंदुस्थानात आहे, पाकिस्तानात नाही” ; सेनेच्या नेत्याचा इशारा
- “मग अमित शहांसोबची चर्चा हे केवळ नाटक होतं का?” बेळगाव आंदोलन तापलं, मविआच्या नेत्यांना अटक
- “एकदम ओक्केच्या घोषणांनी विधानभवन पुन्हा दणादणाला, हिवाळी अधिवेशनाला वादळी सुरूवात”
- “एकनाथ शिंदें साहेब जागे व्हा, भाजपला तुमचं नेतृत्व मान्य नाही”