मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरूवात झाली आहे. पावसाळी अधिवेशनाप्रमाणे याही अधिवेशनात सुरूवातीला विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी पक्षांविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. यावेळीही पन्नास खोके एकदम ओक्के अशी घोषणा विरोधकांनी दिली. त्यामुळे पावसाळी अधिवेशनानंतर आता हिवाळी अधिवेशन देखील वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
“राज्याच्या मातीला फुटीचा, गद्दारीचे संकट तेव्हा महाराष्ट्र पेटून उठतो” ; अजित पवार
राज्यातील महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद, महापुरूषांचा अपमान, मंत्र्यांची बेताल वक्तव्य, आणि राज्यपालांचं छत्रपती शिवाजी महाराजांबाबत वादग्रस्त वक्तव्य करत असताना राज्य सरकारसोबत चहापान कसा करायचा ? असा सवाल करीत राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी अधिवेशनाच्या चहापान कार्यक्रमाला बहिष्कार टाकला.
“देवेंद्रजी…! Cool Down, तुमचा जळफळाट आम्ही समजू शकतो”; राष्ट्रवादीने फडणवीसांना डिवचलं
तर आज सकाळी अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर विरोधकांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर जोरदार घोषणा बाजी दिली. इडी सरकार हाय हाय, बोम्मई सरकार हाय हाय, याचबरोबर पन्नास खोक्के एकदम ओक्के अशी घोषणाही यावेळी देण्यात आली. यावेळी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार, नाना पटोले, मनिषा कायंदे, धनंजय मुंडे, अशोक चव्हाण आदि आमदार उपस्थित होते. तसेच एकदम ओक्केच्या घोषणांनी विधानभवन परिसर दणादणून गेला. तर विरोधकांच्या हातात बॅनर्स घेऊन जोरदार घोषणाही देण्यात आली.
“उद्धव ठाकरेंनी आपला स्क्रिप रायटर बदलावा”, फडणवीसांनी ठाकरेंना डिवचलं
दरम्यान, तर बेळगाव येथे आंदोलन करण्यासाठी निघालेल्या महाविकास आघाडी सरकाच्या नेत्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर सीमाप्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यात जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे हिवाळी अधिवेशन वादळी होण्याची शक्यता आहे.
Read also
- “एकनाथ शिंदें साहेब जागे व्हा, भाजपला तुमचं नेतृत्व मान्य नाही”
- सरकार आंधळ, बहिर, मुक,आणि पळकुट; महामोर्चात भुजबळांचा हल्लाबोल
- “फडणवीसांनी राज्यपाल अन् आपल्या सहकाऱ्यांच्या बुद्धीची तपासणी करावी”, सेनेचा टोला
- “चंद्रकांत पाटलांनी घेतला शाई फेक प्रकरणाचा धसका, आता तोंडावर थेट फेसमास्क लावला”
- अन्, स्टेजवरच सुषमा अंधारेंनी शरद पवार अन् उद्धव ठाकरेंचे घेतले आशीर्वाद, भाजपची टिका