नागपूर : हिवाळी अधिवेशन सुरू होण्याच्या अगोदर नागपुर येथील बंगले सजवले गेले, मंत्रिमंडळाचा विस्तार करण्यात आला नाही तरी हे बंगले का सजवले गेले ? असा सवाल शिवसेनेचे नेते सुनिल प्रभु यांनी हरकतीचा मुद्दा विधानभवनात मांडला. त्यावरून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट सुनिल प्रभू यांच्या प्रश्नाला उत्तर देतांना पक्षात येण्याची खुली ऑफर दिली.
“एकदम ओक्केच्या घोषणांनी विधानभवन पुन्हा दणादणाला, हिवाळी अधिवेशनाला वादळी सुरूवात”
सध्य स्थितीत हिवाळी अधिवेशनात एकही राज्यमंत्री नसताना नागपुर येथील बंगले सजवले गेले आहेत. एका बाजूला सरकार प्रकल्पांतून करोडो रूपये निर्माण करतं. तर दुसरीकडे अशा पद्धतीने सरकारी पैशाचा चुराडा होतोय. हा सरकारी पैशाचा अपव्यय आहे. असं म्हणत सुनिल प्रभू यांनी विधानभवनात आपला मुद्दा उचलून धरला.
“एकनाथ शिंदें साहेब जागे व्हा, भाजपला तुमचं नेतृत्व मान्य नाही”
त्यावर देवेंद्र फडणवीस यांनी उत्तर दिलं की, सार्वजनिक बांधकाम विभागाला थोडं माहितं असतं की, आम्ही मंत्रिमंडळाचा विस्तार कधी करणार आहोत. आम्ही विधानसभेचं कामकाज सुरू असतानाही करू शकतो. तो मुख्यमंत्र्यांचा अधिकार असतो, त्यानंतर सभागृहात सुनिल प्रभू यांनी आक्षेप घेतला. त्यावर तुम्हाला संधी हवी आहे का ? अशी विचारणा देवेंद्र फडणवीस यांनी सुनिल प्रभू यांनी केली. त्यावर सभागृहात एकच गोंधळ उडाला.
सरकार आंधळ, बहिर, मुक,आणि पळकुट; महामोर्चात भुजबळांचा हल्लाबोल
दरम्यान, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सरकारचं हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याद दिवशी विरोधकांनी पुन्हा एकदा पन्नास खोक्यांवरून सरकारला डिवचण्याचा प्रयत्न केला. तसेच विधानभवनातही सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी बघायला मिळाली.
Read also
- “कर्नाटक सरकारची दडपशाही सहन करणार नाही”; बेळगाव प्रवेशबंदीवरून अजित पवार संतापले
- “भाजपच्या दृष्टीने सध्याचे मुख्यमंत्री क्रिकेटमधील नाईट वॉचमन”; काॅंग्रेसची जहरी टिका
- आई ती आईच असते..! राष्ट्रवादीच्या आमदार सरोज अहिरे 2.5 वर्षाच्या बाळाला घेऊन विधानभवनात
- राजकारण तापलं..! “बोम्मई, ही सीमा हिंदुस्थानात आहे, पाकिस्तानात नाही” ; सेनेच्या नेत्याचा इशारा
- “मग अमित शहांसोबची चर्चा हे केवळ नाटक होतं का?” बेळगाव आंदोलन तापलं, मविआच्या नेत्यांना अटक