मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची केवळ महाराष्ट्रातच नव्हे तर देशभरातील सन्माननीय नेत्यांमध्ये गणना होते. गेली जवळपास 50 वर्ष शरद पवार राजकारणात आहे. या काळात ते कार्यरत होती. आता त्यांची ही सर्व जीवनगाथा ऑडिओ स्वरुपात ऐकायला मिळणार आहे.
शरद पवारांची जीवनगाथा आता प्रसिद्ध गायक आनंद शिंदे यांच्या आवाजात ऐकायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार आणि शरद पवारांच्या कन्या सुप्रिया सुळे यांनी याचे एक पोस्टर फ्रेम आणि व्हिडीओ ट्विटरवर शेअर केले आहे. तसेच, या संगीतमय भेटीबद्दल सुप्रिया सुळेंनी शिंदे कुटुंबियाचे आभार देखील मानले.
आपण ही गीते https://t.co/6ggQRyqBHv येथे ऐकू शकाल. सर्व शिंदे कुटुंबियांचे या संगीतमय भेटीबद्दल मनःपूर्वक धन्यवाद.
— Supriya Sule (@supriya_sule) May 26, 2021
लोकप्रिय गीतकार एकनाथ माळी यांनी गीते लिहिलेली आहेत. तर संगीतकार डॉ. उत्कर्ष आनंद शिंदे यांनी ती संगीतबद्ध केली आहेत. शरद पवारांची जीवनकथा’ या अल्बममुळे त्यांच्याबाबत संगीत स्वरुपात जनतेला ऐकता येईल.
दरम्यान, विधानपरिषदेवरील राज्यपाल नियुक्त 12 सदस्यांच्या नावांच्या यादीत राष्ट्रवादीकडून आनंद शिंदे यांच्या नावाची शिफारस करण्यात आल्याचे देखील सांगितले जाते.
Read Also :
- शरद पवारांनी घेतली मुख्यमंत्री ठाकरेंची भेट, दोन्ही नेत्यांमध्ये अर्धातास चर्चा
- ‘म्युकरमायकोसिसच्या मोफत उपचाराबाबतची सरकारची घोषणा फसवी’
- ‘भाजपाची पोलखोल करण्यात वेळ घालवण्यापेक्षा मराठा आरक्षण कसं मिळेल याचा सल्ला सरकारला द्या’
- ‘मालकाच्या कर्तृत्वाचे असे जाहीर पोतेरे करू नये’
- लक्षद्वीप प्रकरणी शरद पवारांचे पंतप्रधान मोदींना पत्र, म्हणाले…