मुंबई : एसटी आंदोलन आणि मराठा आरक्षणाच्या वेळी चर्चेत आलेले वकिल गुणरत्न सदावर्ते यांनी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर जहरी टिका केली आहे. गुणरत्ने यांनी नथुराम गोडसेचा नाव घेऊन शरद पवारांवर टिका केली आहे. यावर आता राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून सदावर्ते यांना कशाप्रकारे प्रत्युत्तर देण्यात येणार ? ते पाहणं महत्वाचं ठरणार आहे.
हेही वाचा…पिंपरी-चिंचवडमध्ये ‘आयआयएम’ची शाखा उभारण्याचा संकल्प! महेश लांडगे यांची मागणी, फडणवीसांना दिले निवेदन
ज्याप्रकारे शरद पवारांच्या विचारांना जसं झोडपून काढलं, तसंच त्यांच्या बगलबच्च्याना झोडपून हाकूलून लावले आहे. अखंड भारताचे भाग्यविधाते नथुरामजी गोडसे यांची भूमिका प्रत्येक भारतीय काळजात ठेवून आहे. गांधीजींचा विचार आता काही शिल्लक राहिलेला नाही. अखंड भारताचा विचार शिल्लक आहे. पाकिस्तानधार्जिना विचार शिल्लक नाही. म्हणून असे विचार काँग्रेस कधीही संपवू शकणार नाही. शरद पवारांचा विचार सुद्धा नथुरामजी गोडसे यांच्या पायाच्या धुळी इतका सुद्धा नाही. असा घणाघात देखील गुणरत्ने सदावर्तेनी केला आहे.
हेही वाचा…महायुतीतील लोकसभा निवडणुकीचा पहिला उमेदवार ठरला, ? कॅबिनेट मंत्र्यांनी ‘या’ नेत्याचं नाव केलं जाहीर
दरम्यान, पुढे बोलतांना ते म्हणाले की, आमसभेत शरद पवारांचे बगलबच्चे गदारोळ सोडा, तोंडातून शब्दसुद्धा काढू शकले नाहीत. कष्टकरी जय श्रीराम, वंदे मातरम म्हणत होते. स्वतःला कामगार म्हणवून घेणाऱ्या संघटनेची घाणेरडी कृती आहे. ज्या अहवालावर प्रभू श्री रामचंद्रांचा फोटो आहे, ज्या अहवालावरती हिंदू राष्ट्र भारत लिहले, त्या अहवालाला हात लावण्याचा प्रयत्न केला म्हणून संघटनेच्या संदीप शिंदे याला झोडपून बाहेर काढला.
READ ALSO :
हेही वाचा…मोठी बातमी..! सुप्रीम कोर्टात विधानसभा अध्यक्षांविरोधात ठाकरे गटाची याचिका? सुनावणीकडे लक्ष
हेही वाचा…” ती लोक मराठी लोकांना खालच्या दर्जाचे, मांस खाणारे म्हणून हिनवतात म्हणून घरे मिळत नाहीत”, आव्हाडांचं ‘त्या’ व्हिडीओवरून मोठं भाष्य
हेही वाचा…एकनाथ शिंदेंच्या सेनेत इनकमिंग सुरूच, ठाकरेंचे ‘तीन’ शिलेदार शिंदेंच्या सेनेत दाखल
हेही वाचा…अजिदादांचं मुख्यमंत्री होण्याचं स्वप्न भंगणार ? भाजप नेत्यांनी दिले ‘हे’ संकेत
हेही वाचा…भाजपच्या ‘या’ खासदारांचे तिकीट कापणार, फडणवीस-शाह यांची बंद दाराआड चर्चा, नव्या उमेदवारांना संधी