मुंबई : महाविकास आघाडीकडून विधान परिषदेवर नियुक्त करण्यासाठी १२ नावांची यादी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे शुक्रवारी सोपवण्यात आली असून शिवसेनेकडून उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्यात आली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फोन करुन उर्मिला मातोंडकर यांना विधानपरिषदेची उमेदवारी दिल्याचं बोललं जात आहे.
दुसरीकडे विजय वडेट्टीवार यांनी काँग्रेसनेही ऑफर दिली होती, मात्र त्यांनी ती नाकारली असा दावा केला होता. दरम्यान शिवसेना खासदार संजय राऊत यांनी उर्मिला मातोंडकर यांना उमेदवारी देण्याचं कारण सांगितलं आहे. ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.
उर्मिला मातोंडकरांना उमेदवारी देण्याचं समर्थन करताना ते म्हणाले की, “उर्मिला मातोंडकर यांचं नाव शिवसेनेच्या यादीत आहे. उर्मिला मातोंडकर यांच्यासारखी सडेतोड बोलणारी व्यक्ती, देश आणि महाराष्ट्रातील प्रश्नांची जाण असणारी अभिनेत्री सभागृहात गेल्यास महाराष्ट्राला फायदाच होईल”.
यादीत कोणती नावं आहेत –
भाजपामधून अलीकडेच राष्ट्रवादीत प्रवेश केलेले माजी मंत्री एकनाथ खडसे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी, अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, गायक आनंद शिंदे, काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत आदींच्या नावांची शिफारस करण्यात आली आहे.
राष्ट्रवादी – एकनाथ खडसे, राजू शेट्टी, यशपाल भिंगे, गायक आनंद शिंदे
शिवसेना – अभिनेत्री उर्मिला मातोंडकर, नितीन बानगुडे पाटील, विजय करंजकर, चंद्रकांत रघुवंशी
काँग्रेस – सचिन सावंत, मुझ्झफर हुसेन, रजनी पाटील आणि गायक अनिरुद्ध वनकर
Read Also –
मागासवर्गीय विद्यार्थ्यांबरोबर आता ‘या’ विद्यार्थ्यांनाही मिळणार परदेश शिष्यवृत्तीचा लाभ
मराठा आंदोलनात सहभागी होणाऱ्यांना ‘या’ कारणामुळे पोलिसांकडून नोटीसा
राष्ट्रवादी काँग्रेसकडून ‘या’ नेत्यांना विधानपरिषदेवर संधी
“राज्यपाल आणि आमचं एकमेकांवर प्रेम, ते यादी नाकारणार नाही”
अखेर यादी समोर आली! महाविकास आघाडीकडून विधान परिषदेसाठी ‘या’ 12 नावांचा प्रस्ताव
‘काल निवडून आलेला पोरगा संसदेत 12 वेळा बोलला आणि 3 टर्म खासदार…’ अमोल कोल्हेंचा आढळरावांना टोला