मुंबई : खासदार संजय राऊत यांनी मोठी घोषणा केली असून, शिवसेना पुढील काही महिन्यात होणारी पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक लढणार असल्याचे म्हटले आहे. पक्षप्रमुखांशी चर्चा करून हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती त्यांनी ट्विट करत दिली.
So, here is the much awaited update.
After discussions with Party Chief Shri Uddhav Thackeray, Shivsena has decided to contest the West Bengal Assembly Elections.
We are reaching Kolkata soon…!!
Jai Hind, জয় বাংলা !
— Sanjay Raut (@rautsanjay61) January 17, 2021
पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक लढविण्याचा निर्णय झाला. आम्ही लवकरच कोलकत्याला पोहचू. जय हिंद!, असे ट्विट करत संजय राऊत यांनी ही घोषणा केली.
एकेकाळी डाव्यांचा गड समजल्या जाणाऱ्या बंगालमध्ये सध्या ममता बॅनर्जी यांची सत्ता आहे. मात्र भाजप देखील जोमाने मैदानात उतरल्याने पश्चिम बंगालमधील निवडणुकीत रंगत आली आहे.
पश्चिम बंगालच्या निवडणुका भाजप, तृणमूल काँग्रेस, डावे पक्ष आणि काँग्रेसबरोबरच ओवेसींची पार्टी AIMIM सुद्धा लढणार आहे. शिवसेना बंगालमध्ये जवळपास 100 जागांवर उमेदवार उभे करू शकते. दरम्यान, याआधी शिवसेनेने काही दिवसांपूर्वी झालेल्या बिहार विधानसभा निवडणुकीत देखील उमेदवार उभे केले होते. मात्र, त्यांच्या अनेक उमेदवारांचे डिपॉझिट जप्त झाले होते.
Read Also :
- ‘निलेश राणेंच्या डोक्यावर परिणाम झाला आहे’, अजित पवारांचे टीकास्त्र
- ‘कायद्यापेक्षा ना मंत्री मोठा ना संत्री’, गृहमंत्र्यांचे सूचक वक्तव्य
- ईडीच्या निशाण्यावर आणखी एक शिवसेना नेता ? किरीट सोमय्यांची चौकशीची मागणी
- ‘कोणी काही करू शकणार नाही, अशा भ्रमात राहू नका’, अण्णा हजारेंचा मोदी सरकारला इशारा
- काँग्रेस आमदाराच्या गाडीचा भीषण अपघात