मुंबई : बेहिशेबी मालमत्तांप्रकरणी गेल्या काही महिन्यांपूर्वी ईडीच्या आणि सीबीआयच्या चौकशीचाय फेऱ्याला सामोरे गेलेले शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक हे गायब झाले असून, त्यांच्या शोधासाठी (ईडी) सक्तवसुली संचलनालय आणि (सीबीआय) केंद्रीय अन्वेषण विभागाने लोणावळा येथील एका रिसॉर्टवर एकत्रितरित्या धाड टाकल्याची बातमी समोर आली आहे. काहीच वेळापूर्वीच दोन्ही संस्थांचे अधिकारी याठिकाणी पोहोचले असून, सध्या त्यांचे शोधसत्र सुरु आहे. याबाबत अधिक अधिकृत माहिती थोड्याच वेळात जाहीर केली जाण्याची शक्यता आहे.
“ईडीचा वापर कोण आणि कशासाठी केला जातो, हे सर्वांना कळून चुकले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील स्वतः विधिमंडळात याबाबत परखड भूमिका घेतली आहे. मी काही असल्या चौकश्यांनी घाबरून जाऊन राज्याची हिताची जबाबदारी बाजूला ठेवणार नाही. मी लढवय्या आहे, मी लढत राहणार. मी स्वतः ईडीच्या अधिकाऱ्यांना सांगितले आहे, नुसता एक फोन केलात तरी १०० वेळा हजर होईन, पण मुलांचा काही संबंध नसताना त्यांना कशाला बोलावता, असे प्रताप सरनाईक यांनी मागच्या वर्षीच्या डिसेंबरमध्ये झालेल्या ईडीच्या चौकशीदरम्यान म्हटले होते.
त्यामुळे आता प्रताप सरनाईक यांच्या लोणावळ्यातील रिसॉर्टवर धाड टाकल्यामुळे याप्रकरणात काय नवीन माहिती पुढे येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. यापुर्वी नोव्हेंबर मध्ये देखील ईडीने टॉप ग्रुप आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी, अमित चांदोळे यांची कसून चौकशी केली होती. त्यानंतर अमित चांदोळे यांना अटक देखील करण्यात आली होती. अमित चांदोळे हे प्रताप सरनाईक यांचे व्यावसायिक भागीदार होते.
Pratap Sarnaik GAYAB!!??
प्रताप सरनाईक कुठे आहात!!?? @BJP4Maharashtra— Kirit Somaiya (@KiritSomaiya) May 18, 2021
Read Also :
- “कोणत्याही परिस्थिती मध्ये गुजरातला पाणी जाऊ देणार नाही” छगन भुजबळ म्हणाले
- ‘एकाच पावसात कटली “मुंबई पॅटर्न”ची पतंग, सगळीकडे थुकपट्टी करून चालत नाही’
- केंद्राच्या खात भाव वाढीच्या निषेधार्थ राज्यात होणार, “टाळी-थाळी बजाव” आंदोलन
- मराठा मोर्चा.! आंदोलनात भाजपा कार्यकर्ते सहभागी होणार – बाळा भेगडे
- ‘पनवतीयों का बाप है ये बॉस’, नितेश राणेंची मुख्यमंत्र्यांवर बोचरी टीका