सिंधुदुर्ग – गेल्या तीन दिवसांपासून नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर न्यायालयात सुनावणी सुरू होती, मात्र आज तिसऱ्या दिवशी नितेश राणे यांना न्यायलायाने मोठा झटका दिला आहे. नितेश राणे यांना अटकपूर्व जामीन देण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. दुपारी जिल्हा बँकेचे मतदान संपल्यानंतर शिवसैनिकांनी फटाके फोडल्याचे आपण सर्वांनी पाहिले, त्यानंतर भाजप आणि शिवसेना कार्यकर्त्यांमध्ये झालेला हायव्होल्टेज ड्रामाही आपण पाहिला, यामुळे बराच काळ कणकवलीत तणाव होता, पोलिसांच्या फौजफाट्याने छावणीचे स्वरूप आले होते ते कसेबसे शात झाले, तोच शिवसैनिकांनी नितेश राणेंचा जामीन फेटाळल्यानंतर पुन्हा फटाके फोडले आहेत.
काँग्रेसला रोखण्यासाठी शरद पवार, उद्धव ठाकरेंनी नाटक केलं; किरीट सोमय्यांचा गंभीर आरोप
नितेश राणेंचा जामीन अर्ज न्यायालयाने फेटाळताच कणकवलीतील शिवसेना शाखेसमोर शिवसैनिक मोठ्या संख्येने जमा झाले. त्यांनी घोषणाबाजी करीत फटाके वाजवण्यास सुरवात केली. या वेळी शिवसेनेचे आमदार वैभव नाईक हे उपस्थित होते. नाईक म्हणाले की, कालपासून नारायण राणे आणि नितेश राणे हे पोलिसांवरच आरोप करीत होते. आता न्यायालयानेच राणेंवरील आरोप मान्य केले आहेत. त्यामुळे नारायण राणे हे केंद्रीय मंत्री असल्याने त्यांनी आपल्या मुलाला कायद्यासमोर हजर करावे.
“तुमचा इतिहास खरं न बोलण्याचा, विश्वास कोण ठेवणार”; चंद्रकांत पाटलांनी पवारांचा इतिहासच काढला
नितेश राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर आज सुनावणी झाली. राणे आणि सरकारी पक्षाच्या वतीने यावर आज युक्तिवाद करण्यात आला. न्यायालयाने राणेंचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला आहे. राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सलग तीन दिवस सुनावणी सुरू होती. राणेंच्या अटकपूर्व जामीन अर्जावर न्यायालयात अखेर फैसला झाला आहे. यामुळे नितेश राणेंना अटक होणार हे आता स्पष्ट झाले आहे. नितेश राणे आणि त्यांच्या स्वीय सहाय्यक यांच्यातील कॉल रेकॉर्ड पोलिसांनी न्यायालयात सादर केले आहे. सचिन सातपुते आणि राणे यांच्यातील कनेक्शन सिद्ध करणारे पुरावे पोलिसांकडे असल्याचेही समोर आले आहे.
Read also:
- “सरकारमधून बाहेर पडून भाजपसोबत सत्तास्थापनेसाठी चढाओढ”; चंद्रकांत पाटलांचा गौप्यस्फोट
- मोठी बातमी: नितेश राणे यांना धक्का, अटकपुर्व जामीन न्यायालयाने फेटाळला
- कोरोना रुग्णसंख्या दोन दिवसांत दुप्पट, राज्यासाठी धोक्याची घंटा – राजेश टोपे
- देवेंद्रजी आपण उद्या मुख्यमंत्री, पंतप्रधानही व्हाल; पण…; संभाजीराजेंनी स्पष्टच सांगितले
- कणकवलीत जिल्हा बँकेचे मतदान पार पडल्यानंतर सेना-भाजप कार्यकर्त्यांमध्ये तुफान राडा