मुंबई : ठाकरे सरकारच गांजाच्या प्रेमात आहे. शरद पवार सांगत आहेत की हर्बल गांजा, तर नवाब मलिक सांगत आहेत की हलका गांजा आहे. तसचं महापौरांच्या मुलाला वरळी येथील कोविड सेंटरच काम कसं मिळालं आहे? महापौर यांचे चिरंजीव साईप्रसाद यांच्या क्रिश इंटरप्राझेस ला हा टेंडर मिळाला आहे आणि हे अपारदर्शक पद्धतीने दिले असल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे.
महिलांबद्दल बोलताना सर्वांनीच काळजी घ्यावी; देवेंद्र फडणवीसांचा सर्वपक्षीय नेत्यांना मोलाचा सल्ला
शिवाय उद्धव ठाकरे यांनी 6 कोविड सेंटर कोणाला दिले हे जाहीर करावे कोविड सेंटर उभं तर केलं आहे पण रुग्ण कुठे आहेत? अगोदर कॉन्ट्रॅक्ट दिल जात आणि नंतर कंपनीची स्थापना केली जात आहे. माहिती लपवण्याचं काम केलं जातं आहे. किशोरी पेडणेकर यांना कोविड आवडत आहे. कारण महापौरांना त्यांच्या मुलाला कॉंट्रॅक्ट द्यायचं आहे तर ठाकरेंच्या लोकांना द्यायची असतात असंही ते म्हणाले. कोविड सेंटरची डॉक्युमेंट देत नाहीत ते फाईल का लपवत आहेत असा सवालही त्यांनी उपस्थित केला.
गोवा आणि युपीमध्ये शिवसेना रणशिंग फुंकणार? संजय राऊतांनी निवडणुकीच गणित सांगितलं
दरम्यान एका दिवसात वीस हजार कोरोना रुग्ण सापडले म्हणतात मात्र त्या रुग्णांपैकी रुग्णालयांमध्ये किती पेशंट आहेत. तसंच जेवढे रुग्ण दवाखान्यात दाखल होतायत तेवढे रुग्ण बरे देखील होऊन दवाखान्यातून बरे होऊन जात असल्याचंही ते म्हणाले. तसेच मुंबईमधील बेड्सच्या संख्येपैकी अजून 25 ट्क्के बेडही भरले नसल्याचंही ते म्हणाले ठाकरे सरकार लोकांमध्ये कोरोनाची भिती निर्माण करत आहे कारण भिती कमाईचं साधन असल्याचा गंभीर आरोपही त्यांनी महाविकास आघाडी सरकारवरती केला आहे.
Read also:
- भाजप नेते गिरीष महाजन अडचणीत; पुणे पोलिसांची जळगावात छापेमारी
- शाळा बंद झाल्या, आता दारुची दुकानं बंद होणार? आरोग्य मंत्री राजेश टोपे म्हणतात…
- देशात कोरोनाचे थैमान, पंतप्रधान मोदींनी बोलावली तातडीची बैठक; काय निर्णय घेणार?
- कोरोनाचे दूत बनू नका, नव्या नियमावलीनंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची कळकळीची विनंती…
- पुरंदर विमानतळासाठी जुन्या जागेचा प्रस्ताव महाविकास आघाडी सरकारला मान्य आहे का? चंद्रकांत पाटीलांचा सवाल