पुणे : वाघ आपल्याला लय आवडतो. पण वाघ जेव्हा जंगलात फिरत असतो तेव्हा तो आपल्याला जंगलाचा राजा वाटतो. पण सर्कशीत रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर वाघ कसरती करत असतो तेव्हा काळजाला वेदना होता. कारण ज्या वाघावर मी जीवापाड प्रेम केले त्याला आज रिंगमास्टरच्या इशाऱ्यावर चालावं लागंत असं म्हणत खासदार अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्ष निशाणा साधला. अमोल कोल्हे यांचा शेतकरी आक्रोश मोर्चा पुण्यात आला असता त्यावेळी ते बोलत होते.
हेही वाचा…पुणे लोकसभा लढण्यास वसंत मोरेंनंतर साईनाथ बाबर देखील इच्छूक ; राज ठाकरे कुणाच्या नावाला पसंती देणार?
शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी खासदार अमोल कोल्हे आणि खासदार सुप्रिया सुळे यांनी शेतकरी आक्रोश मोर्चा काढला आहे. आज शरद पवारांच्या उपस्थितीत शेतकरी आक्रोश मोर्चाची पुण्यात सांगता होणार आहे. त्याआधी काल झालेल्या सभेत अमोल कोल्हे यांनी अजित पवारांवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधत जबरदस्त भाषण केलं. वाघाच्या डरकाळीनं भल्याभल्यांचा थरकाप उडत होता. आज त्याला पिंजऱ्याच्या आडून गुरगुरावं लागतं. कुणीही येणारे जाणारे त्याला दगड मारू शकते ही भावना जेव्हा वाघाची होते. असेच महाराष्ट्राच्या हितासाठी वाघाची डरकाळी फोडणारे जेव्हा दिल्लीच्या इशाऱ्यावर तोंडातून शब्द काढत नाहीत तेव्हा ही भावना नक्कीच जागी होती असं त्यांनी अजित पवारांचे नाव न घेता टोला लगावला.
हेही वाचा…पुणे लोकसभा लढण्यास वसंत मोरेंनंतर साईनाथ बाबर देखील इच्छूक ; राज ठाकरे कुणाच्या नावाला पसंती देणार?
दरम्यान, दरम्यान, मी पुन्हा येईन असं म्हणणार नाही. कारण पुन्हा येईन म्हटलं की अडीच वर्षांनी येता येतंय. अडीच वर्षाने आल्यानंतर तेदेखील अर्धच येता येते आणि काही दिवसांनी अर्ध्याच्याही अर्ध होतंय. त्यामुळे मी पुन्हा येईन म्हणणार नाही. बारामतीत आज माझे स्वागत केले त्याबद्दल मी मनापासून ऋणी आहे. सुप्रिया सुळे यांना संसदेत वावरताना बघतो तेव्हा मातृत्व, कर्तृत्व आणि नेतृत्व याचा महाराष्ट्रचा वारसा आणि वसा समर्थ हातात आहे. याची खात्री पटते. असंही त्यांनी म्हटले.
READ ALSO :
हेही वाचा…“मी बाजारू विचारवंत किंवा धंदेवाईक कार्यकर्ता नाही”, म्हणून.. मिटकरींना त्यांच्याच भाषेत शरद पवार गटाने सुनावलं
हेही वाचा…“मी बाजारू विचारवंत किंवा धंदेवाईक कार्यकर्ता नाही”, म्हणून.. मिटकरींना त्यांच्याच भाषेत शरद पवार गटाने सुनावलं
हेही वाचा…“शीतल म्हात्रे तुझं चिचुंद्रीसारखं तोंड बंद ठेव नाहीतर..”, शीतल म्हात्रेंना सुप्रिया सुळेंवरील टीका भोवली
हेही वाचाराष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना १५ कोटी रूपयांच्या ८० गाड्या नेमक्या कशासाठी? अजित पवार गटाने दिलं ‘हे’ उत्तर
हेही वाचा…“फक्त पक्ष अन् लोकांची घरं फोडण्याचं काम भाजपने केलंय, “सुप्रिया सुळेंचा भाजपवर आक्रोश