पुणे : पुण्यात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. महायुतीकडून भाजपचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या विरोधात कॉंग्रेसचे आमदार रवींद्र धंगेकर रिंगणात उभे आहेत. यातच निवडणुकीसाठी मतदान काही दिवसावर येऊन ठेपलं असतांना प्रचारात सध्या मुरलीधर मोहोळ यांनी आघाडी घेतली आहे. सध्या मोहोळ यांच्या गाठीभेटी मोठ्या प्रमाणात वाढल्या असल्याचे दिसून येत आहेत. अशातच आता हिंदुत्वाची धगधगती मशाल असलेल्या पतित पावन संघटनेने मुरलीधर मोहोळ यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे. या संघटनेने आज मोहोळ यांची भेट घेऊन आपला पाठिंबा जाहीर केलाय.
हेही वाचा…“भारत मातेशी गद्दारी करणे हे कॉंग्रेसच्या रक्तात”, पुलवामा हल्ल्याच्या टिकेवरून सातुपते यांचं शिंदेंना जशात तसं उत्तर
लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुरलीधर मोहोळ यांनी अनेक ठिकाणी गाठीभेटी घेण्यास सुरूवात केली आहे. आज मुरलीधर मोहोळ यांनी आक्रमक हिंदुत्ववादी संघटना अशी ओळख असलेल्या पतीत पावन संघटनेच्या पदाधिकाऱ्यांशी मोहोळ यांनी संवाद साधला. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन त्यांनी मोहोळ यांना आपला पाठिंबा जाहीर केला आहे.
हेही वाचा…“बापू..! तुम्ही म्हणजे ‘फाडा पोस्टर, निकला चुहा’ ?”, शिवतारेंच्या विरोधातलं ‘ते’ पत्र व्हायरल
यावेळी शिवाजीराव चव्हाण, जनाभाऊ पेडणेकर, धनंजय क्षीरसागर, विक्रम मराठे, राजाभाऊ शिंदे, स्वप्निल नाईक, गुरु भाऊ कोळी, संतोष शेंडगे, अशोक परदेशी, प्रवीण झोर, रमेश चलवादी यांच्यासह पदाधिकारी आणि संघटनेचे कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी संघटनेने दाखवलेला विश्वास आगामी काळात निश्चितच सार्थ ठरेल हा विश्वास मोहोळ यांनी व्यक्त केला.
READ ALSO :
हेही वाचा…नवनीत राणांना अजितदादांच्या नेत्याचा विरोध, थेट कारवाई करण्याचा दिला इशारा
हेही वाचा…राजकीय गणितं सांगताहेत, पुण्यात धंगेकरांपेक्षा मुरलीधर मोहोळच वरचढ
हेही वाचा…शरद पवारांच्या निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा विदर्भातून होणार, अमर काळे यांच्या रॅलीत सहभागी होणार
हेही वाचा…मोहिते पाटलांचा अमोल कोल्हेंवर जोरदार प्रहार ; ती टिका भोवली, घेतला चांगलाच समाचार
हेही वाचा…सातारच्या जागेवर शरद पवार यांचा नवा डाव ; माजी मुख्यमंत्र्याला निवडणुकीच्या रिंगणात उतरवणार ?
हेही वाचा…वैद्यकीय क्षेत्रात देशाची प्रगती ; म्हणून मोदींना साथ ! सोलापूरमधील डॉक्टरांच्या भावना : महायुतीचे उमेदवार राम सातपुते यांनी साधला संवाद