मुंबई : आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ठाकरे गटाकडून लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला जात आहे. आज मुंबईत धाराशीव आणि लातूर लोकसभा मतदारसंघासाठी ठाकरेंनी आढावा बैठक बोलावली होती. या बैठकीसाठी जिल्ह्यातील तसेच ग्रामीण भागातील अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी उपस्थितीत होते. यातच आजच ठाकरे गटात असंख्य कार्यकर्त्यांनी प्रवेश केला आहे.
हेही वाचा…“सरकारमध्ये १०० दिवस पूर्ण, स्वत: चा उल्लेख राष्ट्रवादीचे अध्यक्ष करत अजिदादांचं पत्र”
उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत आज मातोश्रीवर परांडा विधानसभा मतदारसंघ, धाराशिव येथील जिनत सय्यद ह्यांच्यासह विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य यांनी आज उद्धव ठाकरे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला आहे. महाराष्ट्राच्या तळागाळातून शिवसेनेवर प्रेम करणारी माणसं संघटनेसोबत जोडली जात आहेत, संघटनेला बळकटी देत आहेत.
हेही वाचा…मुख्यमंत्र्यांच्या दावोस दौऱ्यावर तब्बल ३५ कोटींचा खर्च, “शिंदे सरकार रिक्षावाल्याचे नाही तर चार्टर्ड विमानवाल्याचे आहे”
महाराष्ट्राची परंपरा जपणाऱ्या, लोककलेशी नाळ जोडलेल्या जोशी, कुडमुडे, गोंधळी, वासुदेव, चित्रकथी, मेढंगी, बागडी, सरोदे समाजातील सेवेकरांची, लोककलाकारांची आज उद्धव ठाकरे ह्यांनी मातोश्री निवासस्थानी भेट घेतली. देवदेवतांची सेवा करून, गावोगावी भिक्षुकीसाठी फिरणाऱ्या ह्या सेवेकरी समाजामुळेच महाराष्ट्राची संस्कृती आजही टिकून आहे. ह्यावेळी, गावोगावी फिरत असताना त्यांच्यासमोर येणाऱ्या समस्या ऐकून घेत, शिवसेना नेहमी त्यांच्यासोबत आहे अशी ग्वाही उद्धवसाहेबांनी दिली. तसेच ‘सर्व सेवेकरी भेटले म्हणजे देवाचा कृपाशीर्वाद मिळाला’ अशी भावनाही त्यांनी व्यक्त केली.
आज परांडा विधानसभा मतदार संघ, धाराशिव येथील सौ. जिनत सय्यद ह्यांच्यासह विविध गावातील सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य ह्यांनी आज पक्षप्रमुख मा. श्री. उद्धवसाहेब ठाकरे ह्यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून पक्षात प्रवेश केला.
महाराष्ट्राच्या तळागाळातून शिवसेनेवर प्रेम करणारी… pic.twitter.com/DZ7PloU3mV— ShivSena – शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) October 10, 2023
READ ALSO :
हेही वाचा…राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षांनी चित्रा वाघ यांना लगावला टोला, म्हणाल्या, अहो चित्राताई, अगोदर..,
हेही वाचा…शिवाजी पार्क मैदानावरून दसरा मेळाव्यासाठी शिंदे गटाने माघार का घेतली ? शिंदे गटातील आमदाराने दिले स्पष्टीकरण
हेही वाचा…२०२४ च्या लोकसभेसाठी ठाकरेंचा उमेदवार ठरला, बैठकीत ‘या’ नेत्यांवर केला शिक्कामोर्तब
हेही वाचा…पुणे लोकसभेसाठी कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी सुचवलं ‘या’ नेत्याचं नाव
हेही वाचा…“काॅंग्रेसचा डीएनए महात्मा गांधीचा नाही तर..,’ भाजपचे खासदार अन् यशोमती ठाकूर यांच्यात शाब्दिक वार