मुंबई : : मुंबई पोलीस आणि महाराष्ट्र सरकारला बदनाम करण्यासाठी 80 हजार पेक्षा अधिक फेक फेसबूक अकाऊंट तयार करण्यात आले, असा दावा मुंबई पोलिसांनी केल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे . यावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
सुप्रिया सुळे म्हणाल्या , एखाद्याच्या मृत्यूनंतर 80 हजार फेक अकाऊंटस काढण्यात आली आणि एका पक्षाने त्याचा वापर राजकारणासाठी करण्याचा प्रयत्न केला. हे चित्रच निव्वळ धक्कादायक आणि किळसवाणं आहे’
‘तुमचा सत्ताधारी पक्षावर राग असेल. तुम्हाला कोणत्याही परिस्थितीत सत्तेवर यायचं असेल. पण असं कृत्य करून त्या दिशेने पावले टाकणे हा किळस आणणारा प्रकार आहे. आपली संस्कृती इतक्या खालच्या पातळीवर गेलीये, हे आपल्यासाठी अत्यंत खेदजनक आहे’, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
Read Also :
‘त्या’ फेक अकाऊंट्सचे मालक कोण? हे जाहीर करा; राष्ट्रवादी काँग्रेसची मागणी https://t.co/rb5qHCCOe3 @NCPspeaks
— Political महाराष्ट्र (@PoliticalMH) October 6, 2020