बीड : भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना नुकतीच करोनाची लागण झाल्याचं समोर आलं होतं. त्यानंतर राज्याचे सामाजिक न्याय मंत्री आणि पंकजा यांचे भाऊ धनंजय मुंडे यांनी त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आहे. आपण पंकजा यांना मेसेज करून काळजी घेण्यास सांगितल्याचं धनंजय मुंडे यांनी सांगितलं. एरवी राजकारण करत असताना एकमेकांवर कठोर शब्दांत टीका करणाऱ्या या भावंडांचं कौटुंबिक आयुष्यातलं प्रेम पुन्हा एकदा महाराष्ट्राने पाहिलं आहे.
“ओबीसींवर होणारा अन्याय दूर न झाल्यास मी मंत्रिपदाचा त्याग करणार”
आपण पंकजा यांच्या तब्येतीची विचारपूस केल्याचं धनंजय मुंडे यांनी आज माध्यमांशी बोलताना सांगितलं. पंकजा मुंडेंना करोना झाला आहे, तुम्ही त्यांना फोन केला का? असा प्रश्न पत्रकारांनी करताच धनंजय मुंडे म्हणाले, मी पंकजाताईला फोन करू शकलो नाही, मात्र मेसेजद्वारे सांगितलं की तुला दुसऱ्यांदा करोना झाला आहे. करोना काळात काळजी घेणं फार महत्त्वाचं असतं. विशेषतः पोस्ट कोविड त्रास जास्त असतो. अशावेळी काळजी घेणं गरजेचं आहे. त्यामुळे मी तिला मेसेज केला की काळजी घेतली पाहिजे.
“एकमेकांची उणी-दुणी काढण्यापेक्षा केंद्रातून निधी आणा”; अजित पवारांचा नारायण राणेंना सल्ला
पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांच्यातलं राजकीय वैर महाराष्ट्र वेळोवेळी पाहत असतो. हे दोघे एकमेकांवर सतत राजकीय हल्ले प्रतिहल्ले करत असतात. मात्र या दोघांनीही राजकारण आणि आपलं नातं या गोष्टी स्वतंत्र ठेवलेल्या वारंवार दिसून येतात. पहिल्या लाटेदरम्यान ज्यावेळी दोघांनाही करोनाची लागण झाली होती, तेव्हा दोघांनीही एकमेकांच्या तब्येतीची विचारपूस करत काळजी घेण्याचा सल्ला दिल्याचं महाराष्ट्राने पाहिलं आहे. आता पुन्हा एकदा या दोघांमधलं प्रेम पाहायला मिळालं.
याची ग्रामपंचायत सदस्य व्हायची लायकी नाही आणि म्हणे भावी खासदार; आमदार गोरंट्यालांची खोतकरांवर टीका
दरम्यान, धनंजय मुंडे यांनी नागरिकांनाही काळजी घेण्याचं आवाहन केलं आहे. मधल्या काळात निर्बंध शिथिल झाले, सण उत्सव साजरे करण्यात आले, करोना रुग्णसंख्याही कमी होत होती. या सगळ्यामुळे आपण काहीसे निर्धास्त झालो, मात्र करोनाला हलक्यात घेणं चुकीचं आहे. करोना अध्याप संपलेला नसून नागरिकांनी शक्यतो घरातच राहावं, गर्दीच्या ठिकाणी जाणं टाळावं आणि करोना प्रतिबंधाचे सर्व नियम पाळावेत, असं आवाहनही धनंजय मुंडे यांनी राज्याच्या जनतेला केलं आहे.
Read also:
- म्हाडा, एपीएससी परीक्षेबाबत महत्त्वाची बातमी, ‘या’ दिवशी होणार दोन्ही परीक्षा
- ‘एका बँकेवर विजय मिळवून राज्यात सत्ताबदलाची बोंब मारणे म्हणजे भाकडकथा’; सामनातून नारायण राणेंना चिमटे
- पश्चिम बंगालप्रमाणे महाराष्ट्रातही मिनी लॉकडाऊन? मंत्री विजय वडेट्टीवारांनी स्पष्टच सांगितलं
- राज्यात पुन्हा लॉकडाउन? उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिले स्पष्ट संकेत
- मुंबै बँकेवर प्रविण दरेकरांचा झेंडा; सहकार पॅनेलचा सर्व 21 जागांवर विजय