पुणे – सिंधुदुर्ग जिल्हा बँक निवडणुकीच्या रणधुमाळीत राजकीय वातावरण चांगलेच तापल्याचं पहायला मिळालं. या निवडणुकीपूर्वी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सिंधुदुर्गाचा दौरा केला होता. या दौऱ्यावरुन केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर निशाणा साधला होता. नारायण राणे यांनी केलेल्या या टीकेनंतर आज अजित पवारांनी नारायण राणेंना प्रत्युत्तर देत एक सल्ला दिला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले, सिंधुदुर्ग मध्यवर्ती जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने चांगला प्रयत्न केला पण दुर्देवाने तेथे यश आले नाही. ज्यांना यश आले आहे त्यांचं मनापासून अभिनंदन.. त्यांनी बँक चांगली चालवावी अशा आमच्या शुभेच्छा…!
सूडबुद्धीने गुन्हे दाखल करून नारायण राणेंना नमवण्याचा प्रयत्न; रावसाहेब दानवेंचा गंभीर आरोप
ते पण अनेक वर्षे मंत्रिमंडळात आहेत. कोकणात तौक्ते चक्रीवादळ आलं तेव्हा मदत केली. निसर्ग चक्रीवादळाच्या घटनेनंतर मदत केली. ज्या ज्या गोष्टी कोकणात करायला हव्यात त्या करम्याचा आमचा प्रयत्न आहे. एकमेकांच्या उणी दुणी काढण्यापेक्षा केंद्रात तुम्ही मंत्री आहेत तुमच्या परीने केंद्रातून निधाी आणावा. आम्ही आमच्या परीने राज्यातून निधी देऊ. अशाप्रकारे सर्व मिळून कोकणाचा विकास करू असंही अजित पवार म्हणाले.
Read also:
- “ओबीसींवर होणारा अन्याय दूर न झाल्यास मी मंत्रिपदाचा त्याग करणार”
- नवाब मालिकांनी दोन ऑडिओ क्लिप ऐकवत पुन्हा फोडला बॉम्ब; समीर वानखेडेंवर केले ‘हे’ गंभीर आरोप
- कोरेगाव भिमा पर्यटन स्थळापेक्षा शुरवीरांची भुमी म्हणून ओळखली जावी – नितीन राऊत
- “१२ कोटींची मर्सडिज घेणाऱ्यांनी आता स्वतःला फकीर म्हणू नये”; संजय राऊतांचा मोदींच्या महागड्या गाडीवरून सणसणीत टोला .
- “गावाकडील नारळावरील कुस्ती जिंकून हिंदकेसरी जिंकल्याचा आव आणू नका”; शंभूराजे देसाईंचा राणेंना खरमरीत टोला