सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्हा बँकेची निवडणूकीत भाजपने एकूण 19 जागांपैकी 11 जागा जिंकत महाविकास आघाडीला धूळ चारली आहे. केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवसेनेला चितपट करून मिळवलेल्या विजयामुळे भाजपला बळ आलं आहे. शिवसेनेसाठी ही चपराक असल्याचंही म्हटलं जातं आहे. भाजपच्या या यशामुळे आता सोशल मीडियावर वेगवेगळे मीम्स तसेच फोटो व्हायरल होत आहेत. यामध्ये नारायण राणे वाघाची शेपटी धरुन त्याला बाहेर खेचत असल्याचा फोटो तर चर्चेचा विषय ठरलाय. हा फोटो सध्या चांगलाच व्हायरल होतो आहे. या फोटोच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला जात असल्याचेही बोलले जात आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निकालानंतर एक फोटो सोशल मिडियावर धुमाकूळ घातल आहे. या फोटोमध्ये सिंधुदुर्ग जिल्हा बँक दिसत आहे. तर वाघ या बँकेत शिरण्याचा प्रयत्न करु पाहतोय. मात्र मंत्री नारायण राणे वाघाला त्याची शेपटी धरून बाहेर फरफटत नेत असल्याचं दिसतं आहे. या वाघाला राणे बँकेपर्यंत पोहोचू देत नसल्याचं या फोटोमध्ये दाखवण्यात आलं आहे. या फोटोच्या माध्यमातून शिवसेनेला डिवचण्याचा प्रयत्न केला जात असून सिंधुदुर्ग जिल्हा तसेच महाराष्ट्रभर हा फोटो व्हायरल होत आहे. कोणताही शब्द न वापरता शिवसेनेला खिजवण्याचा हा प्रकार असल्याचं म्हटलं जातंय. व्हायरल होत असलेल्या या फोटोवर नेटकऱ्यांनी तर भन्नाट कमेंट्स केल्या आहेत.
बैलगाडा शर्यतीमुळे युवकांचा एक वर्ग वाया जाणार; राष्ट्रवादीच्या नेत्याने व्यक्त केली चिंता
ही निवडणूक फक्त एका जिल्हा बँकेपुरती असली तरी नारायण राणे आणि शिवसेना वाद अशी किनार या निवडणुकीला होती. याच एका कारणामुळे या निवडणुकीकडे महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. अपेक्षेप्रमाणे या निडणुकीत अनेक धक्कादायक निकाल हाती आले. जिल्हा बँकेच्या निवडणुकीसाठी महाविकास आघाडीचे प्रमुख असेलले सतीश सावंत याचा पराभव झाला. तसेच सिंधुदुर्ग भाजपचे विद्यमान जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनादेखील पराभवाचा सामना करावा लागला. सतीश सावंत आणि विठ्ठल देसाई यांच्यातील लढत तर विशेष ठरली. या दोन्ही उमेदवारांना समान मते मिळाल्यामुळे साडेतीन वर्षाच्या मुलाकूडन चिठ्ठी काढून विजयी उमेदवार ठरवण्यात आला. यामध्ये महाविकास आघाडीचे उमेदवार सतीश सावंत यांचा पराभव झाला. तर भाजपचे उमेदवार विठ्ठल देसाई विजयी झाले.
Read also:
- राज्यातील १० मंत्र्यांना, २० आमदारांना कोरोनाची लागण; अजित पवारांची धक्कादायक माहिती
- “गल्लीत क्रिकेट जिंकणाऱ्यांकडून वर्ल्डकपवर दावा करणे हे हास्यास्पद “
- राज्यातील १० हजार कर्मचाऱ्यांचे परतीचे दोर तुटले; एसटीचे १० हजार कर्मचारी थेट निलंबित
- ऐनवेळी बैलगाडा शर्यत रद्द करण्यामागे राजकीय डाव; शिवाजीराव आढाळराव पाटलांचा रोख कुणाकडे?
- कोरोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर मावळातील बैलगाडा शर्यत तात्पुरती रद्द – आमदार सुनिल शेळके