मुंबई – अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे यांच्यात मागील काळात झालेला संघर्ष संपूर्ण महाराष्ट्राला ज्ञात आहे. समीर वानखेडेंनी नवाब मलिक यांच्या जावयाला हर्बल तंबाखूच्या प्रकरणामध्ये बऱ्याच दिवस चौकशीच्या फेऱ्या मारायला लावल्या होत्या.
त्यानंतर जावयावर सूडबुद्धीने कारवाई झाली म्हणून नवाब मलिक यांनी समीर वानखेडेंच्या विरोधात एक मालिकाच प्रदर्शित केली होती. कोणत्याही परिस्थितीमध्ये समीर वानखेडेंनी राजीनामा द्यावा अशी भीष्म प्रतिज्ञा देखील मालिकांनी घेतली होती.
“गल्लीत क्रिकेट जिंकणाऱ्यांकडून वर्ल्डकपवर दावा करणे हे हास्यास्पद “
न्यायालायने फटकारल्यानंतर नवाब मलिक यांनी काही दिवसांसाठी वानखेडेंच्या विरोधात ट्विट करणे बंद केले होते. आज मात्र मालिकांनी पत्रकार परिषद घेऊन पुन्हा एकदा बॉम्ब फोडला आहे. काही जुन्या प्रकरणांमध्ये पंचावर कसा दबाव टाकला जातो याची प्रचिती आणणारी ऑडिओ क्लिप मालिकांनी पत्रकार परिषदेत सादर केली आहे.sa
नवाब मलिक यांनी यावेळी दोन ऑडिओ क्लिप ऐकवून एनसीबी आणि एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडेंवर गंभीर आरोप केले. एनसीबीकडून कशा प्रकारे बोगस कारवाया केल्या जातात हे त्यांनी सांगितले. या ऑडिओ क्लिपमध्ये मॅडी नावाचा पंच आहे आणि त्याला किरण बाबू नावाच्या अधिकाऱ्याने फोन केला.
राज्यातील १० मंत्र्यांना, २० आमदारांना कोरोनाची लागण; अजित पवारांची धक्कादायक माहिती
एका जुन्या प्रकरणात पंचनाम्यावर सही कर आणि आमच्या समक्ष पंचनामा केला आहे, कारवाईची प्रक्रिया केली आहे, असे त्यात आहे, असे तो अधिकारी सांगत आहे. त्यावर मॅडी नावाची व्यक्ती घाबरून जाते. त्यानंतर मलिक यांनी दुसरीही ऑडिओ क्लिप ऐकवली. यानंतर त्यांनी समीर वानखेडे आणि पंचामध्ये बोलणे झाल्याचा दावा करत गंभीर आरोप केला आहे.
Read also:
- कोरेगाव भिमा पर्यटन स्थळापेक्षा शुरवीरांची भुमी म्हणून ओळखली जावी – नितीन राऊत
- “१२ कोटींची मर्सडिज घेणाऱ्यांनी आता स्वतःला फकीर म्हणू नये”; संजय राऊतांचा मोदींच्या महागड्या गाडीवरून सणसणीत टोला .
- “गावाकडील नारळावरील कुस्ती जिंकून हिंदकेसरी जिंकल्याचा आव आणू नका”; शंभूराजे देसाईंचा राणेंना खरमरीत टोला
- खासदार अमोल कोल्हे यांना डावलले त्यामुळेच शिवाजीराव आढळराव यांची बारी फसली?
- महाविकास आघाडी सरकार हद्दपार करणार; नव्या वर्षी केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंचा संकल्प